भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे निधन
पुणे: भाजपचे जेष्ठ नेते पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दीर्घ आजाराने आज दि,29 रोजी दुःखद निधन झाले,गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. गिरीश बापट यांच्यावर दीनानाथ हॉस्पिटलमध्ये सकाळी उपचारासाठी दाखल केली होते, उपचार सुरू असताना त्यांची प्राण ज्योत मालवली . आज सकाळपासून प्रकृती अधिकच ढासळली होती. अखेर गिरीश बापट यांनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्याच्या राजकारणातील चाणक्य अशी त्यांची ओळख होती. गिरीश बापट यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक ते खासदार असा त्यांचा प्रवास केला. गेल्या दीड वर्षांपासून ते रुग्णालयात दाखल होते. गिरीश बापट यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.दरम्यान खासदार बापट यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
0 Comments