![]() |
लक्ष्मी नगर ते महालक्ष्मी मंदिर रस्ता |
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला महालक्ष्मी मंदिर रस्त्याचे व गावापासून मंदिरापर्यंत जाणारा पालखी मार्गाचे उद्घाटन दि, २२ रोजी करण्यात आले. यावेळी उपसरपंच लक्ष्मण लबडे ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड दीपक आलुरे , तालुका उपाध्यक्ष संतोष बोबडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष दयानंद मुडके, ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील, पिंटू बिराजदार, नीलकंठ स्वामी, भीमा देडे, सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी पोपट पाटील, विठ्ठल होगाडे, सोमा शिंदे, शिवानंद पाटिल, मनोज बारुळे, आदी सह ग्रामस्थ उपस्थित होत.
![]() |
महालक्ष्मी पालखी मार्गाचे उद्घाटन |
0 Comments