सोयाबीनचा स्थिर दराने शेतकरी चिंताग्रस्त, अर्धा उन्हाळा संपला तरी भाव वाढ होईना ! Farmers are worried about the stable price of soybeans,
तुळजापुर /राजगुरु साखरे: तालुक्यामध्ये अलीकडे सोयाबीन पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जात आहे, कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन देऊन जाणारे पीक असल्यामुळे तालुक्याच्या अनेक भागांमध्ये सोयाबीन लावण्याकडे शेतकऱ्यांचा मोठा कल वाढला आहे. परंतु यावर्षी सोयाबीनचा भाव ऑक्टोंबर पासूनच स्थिर असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
गेल्या वर्षी १० हजार २०० रुपयावर गेलेला सोयाबीनचा दर यंदा मात्र ५ हजार २०० रुपयाच्या पुढे जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची साठवणूक करून ठेवली आहे, मार्च एप्रिल मध्ये तरी भाव वाढ होईल या आशेवर शेतकरी बसला होता मात्र एप्रिल महिन्याचा 15 तारीख उलटली तरी अद्याप सोयाबीनचा भाव वाढलेला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी येणाऱ्या नवीन खरीप हंगामाच्या बी बियाणे मशागती यांचे नियोजनासाठी शेतकऱ्यांचा सोयाबीन विक्रीसाठी ओढा वाढला आहे, सोयाबीनचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच भाव वाढेल या आशेने असंख्य शेतकरी अवलंब होते मात्र सोयाबीनच्या घरामध्ये किंचितही वाढ झाली नसल्यामुळे अनेक अनेक शेतकरी मिळेल त्या भावामध्ये सोयाबीन विक्री करत असल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीन दर वाढतील असा बाजार अभ्यास अंदाज व्यक्त करत आहेत पण नेमके कधी वाढणार? हे स्पष्ट सांगतीले जात नाही त्यामुळे केवळ तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीमध्ये अडकला आहे.
0 Comments