Hot Posts

6/recent/ticker-posts

पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांना ९० हजाराची लाच घेताना अटक, धाराशिव लाचलुच विभागाची कारवाई Two officers of the police force were arrested while accepting a bribe of 90 thousand, Dharashiv Bribery Department action

 पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांना ९० हजाराची लाच घेताना अटक, धाराशिव लाचलुचपत विभागाची कारवाई 


धाराशिव  - वाशी तालुक्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान भारत नाईकवाडे हे  दहशतवादी विरोधी पथक धाराशिव येथे सन २०१९ मध्ये नेमणुकीस असताना त्यांनी वाशी येथे पत्त्याच्या क्लब वर रेड करून या प्रकरणातील तक्रारदार व इतरांना आरोपींना केले तसेच त्या दिवशी त्यांनी सदर जुगाराच्या गुन्ह्यातील व वाशी येथील इतर लोकांविरुद्ध कलम ३५३ ३५७ चा गुन्हा दाखल केला होता परंतु ३५३ ३०७ च्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांचा सहभाग नसल्याने त्यांना आरोपी केले नव्हते दिनांक १४ एप्रिल रोजी यातील आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान नाईकवाडे व आरोपी सागर कांबळे पोलीस शिपाई यांनी तक्रारदार यांना सन २०१९ मध्ये  जुगाराच्या गुन्ह्यात मदत केल्याने कलम ३५३ ३०७ मध्ये आरोपी केले नाही म्हणून ५ लाख रुपये किंवा सेकंड हॅन्ड गाडी अशा लाचेची मागणी करून तडजोडीअंती ९० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले परंतु  यातील आरोपींना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारली नाही सदरील गुन्ह्यातील आरोपी यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन परंडा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

याकामी लाचलुपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हैञे यांनी हा सापळा रचला सापळा पथकात पोलीस निरीक्षक विकास राठोड, पोलीस अमंलदार दिनकर उगलमोगले, मधुकर जाधव ,अर्जुन मारकड, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावस्कर, विशाल डोके यांनी कामगिरी बजावली.


Post a Comment

0 Comments