====================
कवितेचे नाव :- गरज पुस्तकांची
ज्ञान मिळावे मज
खुप मोठे व्हावे मी
गरज मज पुस्तकांची
खुप ज्ञानवंत व्हावे मी ॥१॥
सुसंस्कृत बनवी मज
विचार घडवतो नविन
गरज मज पुस्तकांची
व्यक्तीमत्व घडवी नविन ॥२॥
पुस्तक घडवी मज दिशा
देती मज जगण्याची
गरज मज पुस्तकांची
रुची निर्माण करती जगण्याची ॥३॥
सुंदर मानव आहे मी
मज आस आहे फुलण्याची
गरज मज पुस्तकांची
आचारातुन घडेल फुलण्याची ॥४॥
पुस्तके मस्तक सुधारती
जीवनात ताकत देती
गरज मज पुस्तकांची
संकटात बळ मज देती ॥५॥
====================
लेखन :- श्री.पंकज राजेंद्र कासार काटकर
मु.पो.काटी.ता.तुळजापुर
जि.उस्मानाबाद
मो.नं.÷९७६४५६१८८१
0 Comments