Hot Posts

6/recent/ticker-posts

गुरसाळे येथे भीम कन्यांच्या पुढाकारांनी जयंती उत्साहात पार डॉल्बीचा तालावर तरुणाई थिरकली|At Gursale, the birth anniversary was celebrated with enthusiasm at the initiative of Bhima girls The youth swayed to the beat of Dolby

 गुरसाळे येथे भीम कन्यांच्या पुढाकारांनी जयंती उत्साहात पार 
 डॉल्बीचा तालावर तरुणाई थिरकली

 


नातेपुते प्रतिनिधी : गुरसाळे तालुका माळशिरस येथे महिलांनी पुढाकार घेऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली २८  एप्रिल रोजी सुरू झालेली जयंती उत्सव ३० एप्रिलला भव्य मिरवणुकीने डॉल्बीच्या दणदणाटात भीमसैनिकांच्या जल्लोषात जयंतीची सांगता झाली. 

गुरसाळे (बौद्धनगर) तालुका माळशिरस येथील रमाईच्या लेकींनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी महिला जयंती उत्सव समिती स्थापन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 132 वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दि.२८ एप्रिल रोजी लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला २९ एप्रिल सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक रमेश आढाव यांचे व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला व ३० एप्रिल रोजी सायंकाळी सात ते दहाच्या वेळेत सजवलेल्या रथामध्ये भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली डॉल्बीच्यॎ दणदणाटात भीमसैनिकांचा उत्साह ओसोंडून वाहत होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रिपाई चे ज्येष्ठ नेते एन के साळवे ,मातंग युवक संघटनेचे बाळासाहेब लांडगे, सम्यक सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव समीर सोरटे, रिपाईचे युवा नेते रोहित सोरटे, शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख राजकुमारी हिवरकर पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते अक्षय भांड, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर भैया सुळ - पाटील, सतीश वाघमारे, नाना गायकवाड या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

यावेळी जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा जयश्री झेंडे खजिनदार विद्या झेंडे मार्गदर्शक निर्मला भोसले कार्याध्यक्ष वैशाली झेंडे, उपाध्यक्ष सत्वशीला झेंडे,उषा भोसले,संगिता झेंडे,शोभा झेंडे,दिपाली झेंडे, शकुंतला झेंडे, सोनाली झेंडे, सुषमा झेंडे, कुसुम झेंडे, सीमा झेंडे, साधना झेंडे, सुनिता झेंडे, तसेच मेजर सत्यवान झेंडे, युवराज झेंडे, लखन झेंडे, मिथुन भोसले, आदिनाथ झेंडे, सचिन झेंडे, जालिंदर झेंडे, अमर झेंडे, अनंता झेंडे, शशिकांत झेंडे, विशाल झेंडे, संदीप झेंडे, दत्तात्रय झेंडे, सुनील झेंडे, मिथुन झेंडे, आधी उपस्थित होते मिरवणुकीत गुरसाळे सह आजूबाजूच्या गावातील भीम कन्या व भीमसैनिकांनी मोठे गर्दी केली होती .

 गुरसाळे गावचे सुपुत्र व सध्या अमेरिकेत वास्तव्यास असणारे विनोद झेंडे यांच्याकडून बुद्धांची भव्य अशी मूर्ती जयंती उत्सव समितीस भेट देण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती  मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला मिरवणुकीत सर्व महिलांना मुलींना निळे फेटे बांधून शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक जयंतीचे प्रमुख आकर्षण ठरले.


Post a Comment

0 Comments