धाराशिव जिल्हामध्ये उद्या, परवा पुन्हा अवकाळी पाऊसाचे संकेत , प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज!
धाराशिव: जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यापासून उन्हाचा पारा वाढून उकाड्याचे प्रमाण वाढले आहे . मात्र तरी देखील जिल्ह्यामध्ये पावसाची सावट कायम आहे जिल्ह्यात दिनांक 5 व 6 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार वर्तवण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये चाळीस अंशापर्यंत तापमानात वाढ झाली होती, या तापमानामध्ये घट होऊन पुढील चार दिवस 36 अंशाच्या आतच राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यापासून अधून मधून पाऊस हजेरी लावत आहे यामुळे भर उन्हाळ्यामध्ये पावसाळा अनुभवायला मिळत आहे यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. हवामान अंदाजानुसार तुरळक ठिकाणी, वादळी वारा मेघगर्जना, विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता असल्यामुळे जनावरांना उघड्यावर सोडू नये व निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यावे हवामान विभागाकडून कळविण्यात आले आहे.
![]() |
हवामान अंदाजानुसार प्राप्त झालेल्या कृषी सल्ला पत्रिका |
0 Comments