जगाला शांती ,अहिंसा व समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन व सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विशेष कविता
♦️कवितेचे शीर्षक♦️
⛔ मला समजलेले बुध्द ⛔
==============================
तुला समजणे आम्हा शक्य नाही
खरे ज्ञान होणे आम्हा शक्य नाही ॥१॥
बुध्द म्हणजे विज्ञान ज्ञानाचे सार
विवेकाचा बुध्द माझा आहे सार ॥२॥
बुध्द निती आहे,बुध्द माझा विचार
निरपेक्ष,निस्वार्थ जगण्याचे बुध्द सार ॥३॥
सत्य अहिंसा मुळाशी आहे बुध्द
तृष्णा लालसा यांचा त्याग सांगतो बुध्द ॥४॥
दुःखाचा मुळ पाया तृष्णा हे सांगती बुध्द
निरामय जीवन जगण्याचा शुध्द आहे बुध्द ॥५॥
बुध्द माझा शिकवतो मज मानवता
दया,क्षमा ,शांती ही सांगतो निरपेक्षता ॥६॥
संघर्षाला उत्तर सांगतो मज बुध्द
शांततेला उत्तर संयम सांगतो बुध्द ॥७॥
माझी वेदना ही जाणतो बुध्द
वेदनेचा आवाज दुर करतो बुध्द ॥८॥
जगी नांदते सुख शांती समृध्दी
हिच खरी वंदना ठरेल बुध्द ॥९॥
समतेचा ,न्यायाचा ,बंधुतेचा मार्ग सांगतो बुध्द
ममता,करुणा दया क्षमा शांती शिकवतो बुध्द ॥१०॥
===================================
श्री.पंकज रा.कासार काटकर
मु.पो.काटी.ता.तुळजापुर
जि.उस्मानाबाद
मो.÷९७६४५६१८८१
0 Comments