शहापूर येथे शेतकऱ्यांनी सरण रचून केले आंदोलन नळदुर्ग - अक्कलकोट महामार्गासाठी प्रशासनाकडून बेकायदेशीरपणे भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप
![]() |
तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे शेतकऱ्यांनी सरण रचून केले आंदोलन |
धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग अक्कलकोट महामार्गासाठी जमिनीची बेकायदेशीरपणे मोजणी करून भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ संबंधित शेतकऱ्यांनी तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथील दिलीप पाटील यांच्या शेतात बुधवारी दि, 3 रोजी सरण असून आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाची शेतकऱ्यांनी गावातील पोलीस पाटील बालाजी खरात यांना आंदोलन संबंधी माहिती देऊन आंदोलनास सुरुवात केली. यावेळी पोलीस प्रशासनाने समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
नळदुर्ग अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 मध्ये भूसंपादन झालेल्या जमिनी प्रकरणाबद्दल गेल्या पाच वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये शेतकऱ्यांचा लढा चालू आहे. सध्या हा विषय न्यायप्रविष्ठ असताना त्या ठिकाणी प्रशासन मोजणी करून जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपीही शेतकऱ्यांनी यावेळी केला. उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने जिल्हा प्रशासनास शेतकऱ्यांना बाधित क्षेत्राचा मावेजा द्या ,असे आदेश असताना तो डावलुन भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . या अगोदरही येथील शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अनेक आंदोलन करूनही यावर काही न्याय मिळाला नाही.
![]() |
तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे सरण रचून केले आंदोलन |
त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येत या कृतीच्या विरोधात संघर्ष समितीने सरण रचून आंदोलनात सुरुवात केली, सायंकाळी पाच वाजेपर्यंत जर ही बेकायदेशीर मोजणी रद्द केली नाही तर पाच वाजून पाच मिनिटाला त्या ठिकाणी सरनावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेण्याचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला. दरम्यान आंदोलनाची गंभीर तीव्रता लक्षात घेऊन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी आंदोलन स्थळी शेतकऱ्यांशी चर्चा केली व तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी फोन द्वारे शेतकऱ्याची संवाद साधून त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याची आश्वासन दिले. आंदोलनास तुळजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर हे आंदोलन शेतकऱ्यांनी तात्पुरते स्थगित केल्याची माहिती संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी यांनी सांगितले.
या आंदोलनात दिलीप जोशी, सरदारसिंह ठाकुर, व्यंकट पाटील, दिलीप पाटील ,विक्रम निकम, पंडित पाटील, प्रताप ठाकूर , बालाजी ठाकूर,तोलु पाटिल , रहेमान शेख, दयानंद कलशेट्टी, प्रशांत शिवगुंडे ,लोंढे , मेजर चंद्रकांत शिंदे, काशिनाथ काळे, महादेव सुरवसे, विद्याधर मोरे नासाहेब पाटील, बंडू मोरे, प्रभू मोरे आदीसंह शेतकरी उपस्थित होत.
0 Comments