सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी 22 हजार 500 रुपये लाचेची मागणी - लाचखोर तलाठी विरुद्ध गुन्हा नोंद, धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
धाराशिव - न्यायालयीन आदेशाने वडिलांच्या नावच्या जमिनीचा मुलांच्या नावे फेर ओढण्यासाठी 22 हजार पाचशे रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी परंडा तालुक्यातील आनाळा सज्जाचे तलाठी महेश मुकदम यांचे विरोधात आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी 22 हजार 500 रुपये लाचेची मागणी केल्या प्रकरणी परंडा तालुक्यातील अनाळा येथील तलाठी महेश मुकादम विरोधात पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धाराशिव लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली असुन तलाठ्याने लाचेची मागणी केली मात्र संशय आल्याने लाच स्वीकारली नाही त्यामुळे लाचेच्या मागणीचा गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार शेतकरी इनगोंदा येथील एका शेतकऱ्याच्या नावे असलेली जमीन त्यांच्या मुलाच्या नावे करण्यासाठी न्यायालयाने आदेशित केली होते. या अनुषंगाने न्यायालयाचा आदेश घेऊन शेतकऱ्यांचा नातू आनाळा सज्जाचे तलाठी महेश मुकदम यांच्याकडे गेला होता. यावेळी त्यांनी या कामासाठी 40 हजार लाचेची मागणी केली तडजोडीअंती 22 हजार 500 रुपये लाच देण्याचे ठरले होते. जमिनीचा फेर घेऊन ऑनलाईन सातबाऱ्याला नोंद घेण्यासाठी 40000 रुपये लाच मागणी करुन 22 हजार 500 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानंतर तक्रारदार यांच्या वैक्तिक अडचणीमुळे पुढील कारवाई थांबविण्यात आली होती. तक्रारदार यांनी पुन्हा कळविल्यावरून सापळा कारवाई केली असता, तलाठी मुकादम यांना संशय आल्याने लाच रक्कम स्वीकारली नाही. तक्रारदार यांनी व्हाईस रेकॉर्डिंग ही केली होती या व्हॉइस रेकॉर्डिंग च्या आधारे तलाठी मुकदम यांनी लाच मागितल्याचे सिद्ध झाले. यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तलाठी यांचे विरुद्ध भुम तालुक्यातील अंबी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
22 नोव्हेंबर 2022 रोजी ही घटना घडली होती, तपासाअंती तब्बल साडेसहा महिन्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तलाठी मुकदम यांनी शेकडो शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक केल्याचे शेतकरी सांगत आहेत. फेरफार बोजा किंवा इतर कोणत्याही कागदपत्रासाठी ते पैशाची मागणी करत होते.
पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक सिद्धराम मेहेत्रे सिद्धाराम महेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अशोक हुलगे यांनी काम पहिले. सापळा पथकात पोलीस अमलदार सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य यांचा समावेश होता.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत विभागाने केले आहे.
खाजगी लेखनिकाकडून शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक
आनाळा, देगाव,वाटेफळ,शेळगाव ,मलकापुर आदी तालुक्यातील बहुंताश तलाठी सज्जावर त्यांच्या हाताखाली तलाठ्याने आर्थिक व्यवहारासाठी खाजगी लेखनिक नेमले आहेत. सदरील लेखनिक उपस्थित नसल्याने शेतकऱ्याची आडवणूक व आर्थिक वळणूक करीत आहेत करीत आहेत. या दलालांच्या विरोधात शेतकरी भीतीपोटी कोणतीही तक्रार करीत नसून सदरील दलालांवर तात्काळ कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
0 Comments