Hot Posts

6/recent/ticker-posts

रचना योगा सेंटर तर्फे निसर्गाचे नंदनवन महाबळेश्वर येथेजागतिक योगादिन संपन्न|World Yoga Day was held at nature's paradise Mahabaleshwar by Rachna Yoga Center

 रचना योगा सेंटर तर्फे निसर्गाचे नंदनवन महाबळेश्वर येथे जागतिक योगादिन संपन्न


  नातेपूत प्रतिनिधी : नातेपूते ता.माळशिरस  जि .सोलापूर येथिल रचना योगा सेंटर  तर्फे यावर्षी जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून पाचगणीजवळील भारत स्वच्छता पॉईंट  येथे योगा प्रात्यक्षिकांचे मुक्त सादरीकरण करण्यात आले .

    सृष्टीतील सर्व सजीव परस्परावलंबी  जीवन जगत असतात त्यांच्यातील साधर्म्य साधणारे तत्व म्हणजेच योगा होय योगातील ध्यान सुत्राव्दारे मनाची एकाग्रता साधून सृष्टीने उत्सर्जित केलेल्या चेतनांशी एकरुपता साधली जाते आणि यातून मिळणारी आल्हाददायक उर्जा मनाला अंर्तबाह्य आनंदित करते हा योगाचा चमत्कार आहे  जंगल समृध्दी, वन्यजीव, समुद्र किनारे, उंच पठारे ,डोंगर दऱ्या खोऱ्यातून मंत्रमुग्ध होऊन वाहणारा गंधित वारा मनाला स्पर्शुन जातोआणि योगाचा परमोच्च आनंद निसर्गाशी एकजीव होतो.विचारांची सकारात्मकता व मनशांती मिळून जीवन आनंदमय होते 

      योगामुळे उत्तम आरोग्य, शरीर सुदृढता, मानसिक स्वास्थ्य,अध्यात्मिकता लाभते एकता, एकात्मता, एकात्मिकता यातून एकमेकाप्रती आपलेपणा व माणुसपणाचे भावविश्व फुलून जग कल्याणी भावना निर्माण होते योगातील सप्त सूत्रे यम, नियम, प्रत्याहार, ज्ञान ,आसन,भक्ती आणि ध्यान याद्वारे सर्वधर्मसमभाव ही भावना वाढून हृदयात विश्वबंधुत्वाची धारणा निर्माण होते म्हणून जागतिक योगादिन म्हणजे विश्वशांतिचा महान यज्ञच होय 

   प्रत्येकाला सुटी असते पण  मातेला कधीच सुटी मिळत नाही  निदान एकदिवसतरी मुक्तपणे मनसोक्त तिला फिरता यावे यासाठी घरच्यांची परवानगी मिळताच आनंद गगनात मावेनासा झाला आणि स्वच्छंदी फुलपाखरागत मनलहरी हिरव्यागर्द वनराईत बागडू लागल्या .


अखेर प्रत्येकाला आपले मनोगत व्यक्त करण्या साठी,मनात दाटलेल्या भावना, मुक्त करण्यासाठी छोट्या सभेचे आयोजन केले .प्रत्येकीने रचनाचे आभार मानताना हृदयात भरुन आलेले शब्द बोलताना त्या शब्दांना डोळ्यातील आसवांच्या जलधारांनी ओलेचिंब भिजविले 

   योगामुळे मी टेन्शन मुक्त झाले  माझी शुगर नॉर्मल झाली  मला ऊठता बसता येत नव्हते आता मी हात न टेकता ऊठते बसते कांही जणिंच्या ब्लडप्रेशरचे डोस ही कमी झाले

वजन कमी झाल्याने अनेकींनी सुडौल बांधा मिळाल्याचे समाधान व्यक्त केले  काहींची  टाचदुखी , सांधेदुखी, जखडलेला खांदा नीट झाला होता  आता मी भाकरी थापू  शकते हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता.

Post a Comment

0 Comments