पालमचे गटशिक्षणाधिकारी मा.अकबर सय्यद यांचा काटी प्रशालेकडुन सत्कार
================================
तुळजापुर दि,३० : तालुक्यातील काटी येथील जि.प.(हायस्कूल ) प्रशाले तर्फे पालमचे नुतन गटशिक्षणाधिकारी मा.सय्यद अकबर यांचा सत्कार करण्यात आला.काटी प्रशालेचे ते माजी मुख्याध्यापक आहेत.काटी प्रशालेमधुन त्यांना गटशिक्षणाधिकारी पदावर पद्दोन्नती मिळाली.ते सध्या परभणी जिल्ह्यात पालम येथे गटशिक्षणाधिकारी म्हणुन कार्यरत आहेत.शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पेढा भरवुन प्रशाले तर्फे त्यांचा सत्कार केला गेला.
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.कोळी,सत्यवान रसाळ ,पंकज काटकर,गुरुप्रसाद भुमकर,राहुल सुरवसे,नागेश भोसले,हणुमंत कदम,अजित इंगळे,सुधीर जाधव,दैवशाला कांबळे,वैशाली क्षिरसागर,श्रीमती पवार लिपिक पांगे,परिचर इगवे आणि विद्यार्थी उपस्थिती होती.
"मी काटी प्रशाला कधी विसरु शकत नाही,ही माझी कर्मभूमी आहे.इथे मला चांगले काम करता आले.मी आपला सदैव ऋणी आहे.सत्काराला उत्तर देताना गटशिक्षणाधिकारी सय्यद म्हणाले.आपली शिस्त,शाळेचा दर्जा सदैव कायम ठेवु असे आश्वासन मुख्याध्यापक कोळी यांनी दिले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक श्री.पंकज काटकर यांनी केले.
0 Comments