पेनूर येथील मुख्य चौकात लवकरच होणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक
शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या पाठपुराव्यास यश;सामान्य प्रशासन विभागाने स्मारक आराखडा व अंदाजपत्रक सादर करण्याचे दिले आदेश
सोलापुर - पेनूर येथील मुख्य चौकामध्ये बस स्टॅन्डजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक तयार होणार असून शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की मोहोळ पंढरपूर आळंदी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये पेनूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या जागा महसूल प्रशासनाने ताब्यात घेऊन राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाकडे वर्ग केली होती मात्र त्यामधील जागा शिल्लक होती. या शिल्लक जागेमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे अशी गावातील समस्त जनतेची इच्छा होती. हीच इच्छा गावातील नागरिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्याकडे बोलून दाखविली ,त्यांनी तेवढीच तत्परता दाखवत स्मारक व्हावे यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून सामान्य प्रशासन विभागाने स्मारक उभारणे व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले आहे.
पेनूर गावामध्ये छत्रपतींचे स्मारक व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव केशव जाधव यांनी शासनाच्या प्रचलित धोरणानुसार प्रस्ताव मागवून त्याचा परिपूर्ण स्मारक आराखडा व अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांना भेटून व त्यांच्या शिफारशीसह पाठपुरावा व पत्रव्यवहार केला होता.
स्मारकास प्रशासनाचा आदेश आल्याने पेनूर पंचक्रोशीतील जनता समाधानी आहे
पेनूरमध्ये होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी महाराष्ट्र शासनाचे सचिव जाधव साहेब यांनी जिल्हाधिकारी व मुख्य सचिव यांना आदेश दिल्यामुळे पेनूर पंचक्रोशीतील जनता समाधानी झाले आहे.चांगल्या कामासाठी पेनूर मधील सर्वसामान्य जनता सहकार्य करते आणि सर्वसामान्य जनतेच्या सहकार्यामुळे पेनूरमध्ये विकास कामे करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने करत आम्ही पुरेपूर विकास कामांची सांगड घालत सर्वसामान्य जनतेसाठी सुविधा देत आहोत. पेनूर गावच्या विकासासाठी पेनूर गावचे माजी सरपंच रमेश माने,गावचे विद्यमान सरपंच सुजित आवारे व विद्यमान उपसरपंच सागर (मास्तर) चवरे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल माने बाळासाहेब चवरे यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे.
-चारणराज चवरे,शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर
-०-
0 Comments