Hot Posts

6/recent/ticker-posts

काटी येथील जिल्हा परिषद शाळेस सन सॅरमिक उद्योग समुहातर्फे फर्निचर भेट =====================

 काटी येथील जिल्हा परिषद शाळेस  सन सॅरमिक उद्योग समुहातर्फे   फर्निचर भेट

=====================




तुळजापुर दि,१५ : तालुक्यातील  येथील  जिब्हा परिषद प्राथमिक शाळेस सन सॅरमिक उद्योग समुहातर्फे  फर्निचरची भेट देण्यात आली.सन सॅरमिक उद्योग समुहाचे श्री.विजय बाजीराव देशमुख,संजय बाजीराव देशमुख आणि गजानन देशमुख  काटी यांच्या परिवाराच्यावतीने शाळेस आज दि.१५ जून २०२३ वार गुरुवार दिनी लोखंडी कपाट,चार प्लाॅस्टिक खुर्ची आणि व्हिलचिअर भेट देण्यात आली.याची अंदाजीत किंमत २५००० रु. असुन शाळेस या अनमोल फर्निचरची भेट देवुन शालेय व्यवस्थापन समिती व शाळा प्रशासन यांच्या ताब्यात फर्निचर देण्यात आले.

         फर्निचर भेट देण्यासाठी सन सॅरामिक उद्योग समुहाचे प्रतिनिधी म्हणुन गजानन देशमुख उपस्थित होते.शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला.


        कार्यक्रमासाठी  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाहिर लाडुळकर,गणपत चिवरे,उपाध्यक्ष सुनिल गायकवाड,मुख्याध्यापक कोळी सर ,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान रसाळ ,सहशिक्षक पंकज  काटकर आणि  सर्व कर्मचारी शिक्षक वृंद उपस्थित होते.

              शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन गुलाबपुष्प,पाठ्यपुस्तक,चाॅकलेट देऊन स्वागत करण्यात  आले.शालेय पोषण आहारात शिरा वाटप करण्यात आला.

          कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.पंकज काटकर तर आभार प्रदर्शन सत्यवान रसाळ यांनी केले.


Post a Comment

0 Comments