जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कविता
👇👇👇👇👇👇
माझे हायकू काव्य
विषय:- आकाश/धरती/ सागर
====================|
आकाश थोर
आभाळमाया फार
आकाश घार ॥१॥
धरिती माझी
फुलविती संसार
भुमीप्रहार ॥२॥
थोर सागर
अनंत निराकार
समुद्र सार ॥३॥
सागर पार
सपान विरहाचे
आकाश नाचे॥४॥
धरिती कार
पुत्र वसुंधरेचा
भुमी पुत्राचा ॥५॥
====================
श्री.पंकज राजेंद्र कासार काटकर
सहशिक्षक
जि.प.प्रा.शा.काटी.ता.तुळजापुर
जि.धाराशिव
हायकू
विषय= निसर्गराजा
🌹🌹🌹🌹🌷🌹🌹🌹🌹
===================
निसर्ग राजा
कसा असा फुलला
प्रितीचा झुला ॥१॥
हिरवे पान
फुल निसर्ग राजा
तृणांचा राजा ॥२॥
हिरवे तृण
झुलले हवेवर
हरित गार ॥३॥
निसर्ग फुल
सुगंध पसरतो
पारवा गातो॥४॥
निसर्ग राजा
पाना फुलांत खेळे
जलाचे तळे ॥५॥
कशी ही बाग
बहरली फुलांची
शाळा खगांची ॥६॥
निसर्ग राजा
होतो आहे बेभान
पडे सपान ॥७॥
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
====================
श्री.पंकज कासार काटकर
काटी.ता.तुळजापुर
मो.नं.÷९७६४५६१८८१
विषय :- वसुंधरा
कवितेचे नाव- हे वसुंधरे
=x=x=x=x=x=x=x=x=x=x=
हे वसुंधरे,
तुझा आक्रोश नाही गं,
ऐकू येत मनात आमच्या,
तुझा टाहो नाही गं,
घुमत उरात आमुच्या ॥१॥
हे वसुंधरे,
तुच गं भुमाता, तूच गं धरित्री,
तुच गं जननी,तूच गं निर्मिती,
तुच गं अवनी,तूच गं भूमिती
तुच गं आकृती,तूच गं भूकिर्ती
॥२॥
हे वसुंधरे ,
तुझ्या गं गर्भात उःषकाल उद्याचा,
निसर्ग जप तू काल अन आजचा,
विज्ञानाचा निर्मळ झरा गं तू,
भूगोलाचा आकार गं तू ॥३॥
हे वसुंधरे,
तुझ्या गर्भात लपली खनिजे,
तुझ्या गर्भात लपले पाणी,
तुझ्या गर्भात लपले खनिजे तेल,
तुझ्या गर्भात लपले माणिकरत्ने
॥४॥
हे वसुंधरे,
निसर्गाची सहनशिलता तु,
निसर्गाच्या सर्जनाची जननी तू,
निसर्गाच्या चमत्काराची माय तु,
निसर्गाच्या स्पंदनाची टिकटिक तू
॥५॥
हे वसुंधरे,
तुच गं भूगोल,तूच गं नकाशा,
तुच गं इतिहास,तूच गं अर्थशास्र,
तुच गं शरिरज्ञान,तूच गं प्राणीज्ञान
तुच गं वृक्षविज्ञान,तूच गं रत्नज्ञान
॥६॥
हे वसुंधरे,
मर्यादा तुझी संपता,
करती तू धरणीकंप,
मानवा साधतो स्वार्थ,
त्याला म्हणतो भूकंप ॥७॥
=x=x=x=x=x=x=x=x=x=x=
पंकज कासार काटकर
सहशिक्षक
जि.प.प्रा.शाळा.काटी.
ता.तुळजापुर
जि.धाराशिव
मो.- ९७६४५६१८८१
0 Comments