तुळजापूर तालुक्यातील अलियाबाद येथील धरित्री विघालयाचा दहावीचा १००% निकाल !
तुळजापुर - येथील ज्ञानदीप कलोपासक मंडळ संचालित नळदुर्ग धरित्री विघालय अलियाबाद माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अपेक्षेप्रमाणे याही वर्षा यशाची परंपरा कायम ठेवली आहे आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक विघार्थी संख्या अनाथ असलेली मराठी शाळा म्हणून धरित्री विघालयची ओळख आहेच पण त्याचबरोबर कला ,क्रीडा,पथनाटय या क्षेत्रातील यशाबरोबर विघालयने माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये यशाची आपली परंपरा कायम ठेवली आहे.इयत्ता दहावीचे बोर्ड परीक्षेतला एकूण ५४ विघार्थी प्रविष्ट झाले होते. एकूण ५४ पैकी ५४ विघार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा दिली होती .एकूण शाळेचा निकाल १०० टक्के असा लागला आहे.पुढील प्रमाणे शाळेचा निकाल आहे.४६ विघार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण ,०७ विघार्थी प्रथम श्रेणीत ,०१ विघार्थी द्बितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले .विघालयातून प्रथम -भक्ती सुशिल पोतदार (९०.८०टक्के ) ,द्बितीय - पल्लवी राजेंद्र राठोड ( ८९.८० टक्के ) ,तृतीय - निदा सैपन मुकादम (८९.६० टक्के ) तृतीय व मुलांमध्ये प्रथम -समर्थ बाबुराव काळे ( ८९.६० टक्के ) सर्व यशस्वी मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकत्तेर ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments