Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील काटी प्रशाला व प्राथमिक शाळा येथे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

तुळजापुर तालुक्यातील काटी प्रशाला व प्राथमिक शाळा येथे राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

===============================



तुळजापुर: तालुक्यातील काटी येथील जि.प.हायस्कुल (प्रशाला ) आणि प्राथमिक शाळेमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

  प्रारंभी राजर्षी शाहु महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर सर्वांनी अभिवादन केले.

छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर सहशिक्षक पंकज काटकर यांनी प्रकाश टाकला.शाहु महाराजांच्या सामाजिक,शैक्षणिक कार्यांची माहिती काटकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली.

   कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.कोळी,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान रसाळ,सहशिक्षक पंकज काटकर,सुधीर जाधव,नागेश भोसले,हणुमंत कदम,इंगळे,राहुल सुरवसे, सहशिक्षिका दैवशाला कांबळे ,वैशाली क्षिरसागर,पवार मॅडम ,सेवक किरण इगवे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments