संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मदिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
धाराशिव- संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मदिवसानिमित्त (दि.30) धाराशिव येथे विविध क्षेत्रातील महिलांचा सुप्रिया सन्मान प्रमाणपत्र आणि साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा खा.सुप्रियाताई सुळे महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ.मनीषा पाटील यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.वृंदाराणी विधाते, अॅड. भाग्यश्री रणखांब, अॅड. झीनत प्रधान, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गोडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, युवक नेते रणवीर इंगळे, अमोल पाटील, श्री.स्वामी, केशेगावचे उपसरपंच शिंदे, अमोल पाटील, मंजुषा खळदकर, कोंडाबाई राखुंडे, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष रंजना भोजने, उपाध्यक्ष सुनीता जगदाळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनिता गरड व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात पोलीस पाटील प्रतिभा वाकुरे, श्रुतिका वाकुरे, स्वाती गवाड, सुषमाराणी सुरवसे, सुकुमार फेरे, रंजना भोजने, करिश्मा सय्यद, मंगल काटे, रत्नमाला मोरे, रेखा गंगावणे, वृषाली शेंडगे, उमेद अभियानच्या अॅड.झीनत प्रधान, प्रतिभा गजभार, डॉ.वृंदा विधाते, सीमा कदम, संगीता राठोड, सविता पवार, प्रेरणा आखाडे, जयश्री रानडे, छाया तुपसुंदरे, माधवी गुंडरे, सुरेखा पडवळ, शोभा लोमटे, कोमल चव्हाण, अंगणवाडी कार्यकर्त्या सुवर्णा चौरे, अनुराधा कुलकर्णी, फातिमा शेख, रेणुका डाळे, रंजना राऊत, मदिना शेख, आरती जयशेट्टी, वैशाली झेंडे, सूर्यकला घोडके, निर्मला कुलकर्णी, कमल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस, महिला आघाडी, युवक काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments