कृषी विभागामार्फत एकशिव व तांबेवाडी येथे कृषी संजीवनी सप्ताह संपन्न
नातेपुते प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय माळशिरस मार्फत कृषी संजीवनी सप्ताह मौजे एकशिव व तांबेवाडी येथे दिनांक २८ जून रोजी महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत बाजरी बियाणे वाटप करण्यात आले यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी सतीश कचरे यांनी बाजरी पिकाविषयी व पिक विमा ,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना गोरख पांढरे कृषी पर्यवेक्षक यांनी पी एम किसान, बीज प्रक्रिया, शेततळे व हनुमान खरात कृषी सहाय्यक यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग ,राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याविषयी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित गावचे सरपंच संतोष बोडरे उपसरपंच सागर तांबे माजी उपसरपंच तुषार भोईटे माजी सरपंच सचिन साळुंखे शेतकरी गटाचे अध्यक्ष राजेंद्र तांबे कार्य सोसायटीचे चेअरमन रुपनवर व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावचे कृषी सहाय्यक डी जे पांढरमिसे यांनी केले व त्यानी शेतकऱ्यांना महाडीबीटी एमआरइजीएस फळबाग लागवड प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेचे अर्ज भरणे व हुमनि नियंत्रणासाठी लाइट ट्रप बसवण्यासाठीआव्हान केले माजी उपसरपंच तुषार भोईटे यानी सर्वाचे आभार मानले.
0 Comments