Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील आश्रम शाळा शिक्षकांच्या पगारी १० तारखेपर्यत न झाल्यास सामूहिक आत्मदहनचा इशारा

 जिल्ह्यातील आश्रम शाळा शिक्षकांच्या पगारी १० तारखेपर्यत न झाल्यास सामूहिक आत्मदहनचा इशारा



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.




  धाराशिव  -धाराशिव जिल्ह्यातील आश्रम शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचा दरमहापगार 10 दहा तारखेपर्यंत नाही झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहेे.

या संदर्भात  जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,   शिक्षणाची ज्ञानगंगा तांड्यावर, दुर्गम भागात पोहोचवणाऱ्या आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी यांचा दरमहा दहा तारखेला पगार होणे अत्यंत आवश्यक आहे.  अनाथ, अपंग, ऊसतोड मजूर कामगारांची मुले, भटक्या व विमुक्त जातीच्या मुलांना ज्ञान देण्याचे काम आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी करत आहेत . परंतु वारंवार काहीतरी कारण सांगून समाज कल्याण विभागाकडून जाणीवपूर्वक दरमहापगारीसाठी विलंब केला जातो. सध्या समाज कल्याण अधिकारी सहाय्यक आयुक्त  बाबासाहेब आरावत यांनी जाणीवपूर्वक माहे मे 2023 चे वेतन बिल काढले नाही. त्यामुळे शिक्षक व कर्मचारी मानसिक तणावात आहेत. वाढती महागाई, पतसंस्था, गृहकर्ज, पाल्यांचा शिक्षणाचा खर्च इत्यादी कारणामुळे शिक्षक व कर्मचारी पगार वेळेत नाही झाल्यास मानसिक तणावात आहेत. सध्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया शाळेत चालू आहे. त्यासाठी सर्व शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना उन्हाचा त्रास सहन करून, भटकंती करून, विद्यार्थी प्रवेश करावे लागत आहेत. पगार नसल्यामुळे मानसिक त्रास सहन करून काम करावे लागत आहे, असे आसमानी व सुलतानी संकट आहे.   शासन व प्रशासन यांनी त्वरित सहकार्य, मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी शिक्षकांचा मे 2023 चा पगार  दिनांक 26 जुलै 2023 पर्यंत नाही झाल्यास आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर   सामूहिक आत्मदहन करतील.                      

धाराशिव जिल्ह्यातील सुमारे 35 ते 40 आश्रम शाळा असून यामध्ये शिक्षक व कर्मचारी ५०० आहेत. तरी  मुख्यमंत्री  यांनी  आश्रम शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत करून होत असलेला अन्याय त्वरित थांबविण्याची मागणी केली आहेे. हे निवेदन आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी प्रतिनिधी सतीश शहाजी कुंभार यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments