Hot Posts

6/recent/ticker-posts

पांगरदरवाडी ग्रामपंचायतच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार व मागण्यांचे निवेदन

 पांगरदरवाडी ग्रामपंचायतच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार व मागण्यांचे निवेदन 



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.




तुळजापूर: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेच्या पाणी साठवण डॅमचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी (दि.१६) रोजी पांगरदरवाडी ता.तुळजापूर येथे उपस्थित झाले असता उपसरपंच सोमनाथ शिंदे,

ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण क्षीरसागर तसेच पांगरदरवाडी ग्रामस्त यांचे वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

      यानिमित्ताने गावच्या वतीने विविध मागण्यांचे लेखी निवेदन ही सादर केले आहे.निवेदनात म्हटलें आहे.की पांगरदरवाडी महसूल गावांसाठी स्वतंत्र तलाठी सज्जा करण्यात यावा, येथील जि.प.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी स्वतंत्र ग्राउंड उपलब्ध करुन द्यावे,

पांगरदरवाडी गाव अंतर्गत सिमेंटचे पक्के रस्ते बांधणी करिता आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा, मौजे पांगरदरवाडी ते मसला खुर्द पक्का रस्ता करण्यात यावा.तसेच पांगरदरवाडी ते दहिवडी अर्धवट रस्ता तात्काळ पुर्ण करण्यात यावा. महत्वाचे म्हणजे भूमिपूजन केलेल्या डॅमला पांगरदरवाडी हे नाव देण्यात यावे,जल जिवन मिशन योजनेत पांगरदरवाडी गावचा समावेश करावा.आदी विषय नमुद केले आहेत.

यावेळी उपसरपंच सोमनाथ शिंदे, प्रमोद कदम,

दादाराव शिंदे, प्रताप शिंदे, सुनील शिंदे, लक्ष्मण शिंदे,अलिप सय्यद, बालाजी मारडकर, सुभाष मते,सागर फंड, राजेंद्र गुलाब जाधव,मोहन क्षीरसागर, धनाजी शेळके, रामभाऊ शेळके, जेष्ठ महिला केराबाई मारडकर,अनिता कदम,लता धनाजी कदम,रुपाली महादेव शिंदे,मई मते,नागनाथ शेळके,हणमंत डोंगरे, बाळासाहेब गाटे, शिवाजी गाटे,अमोल मारडकर, गणेश गायकवाड, बापू साळुंखे, महादेव सावंत, राजकुमार शिंदे,नाना मारडकर, गौतम डोंगरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments