तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे श्री गजानन महाराज पालखीचे ग्रामस्थांच्या व तोष्णीवाल कुटुंबियांच्या वतीने जल्लोषात स्वागत
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
![]() |
श्री गजानन महाराज पालखीचे ग्रामस्थांच्या व तोष्णीवाल कुटुंबियांच्या वतीने जल्लोषात स्वागत
तुळजापूर: तालुक्यातील सांगवी मार्डी येथे दि,२१ जुन रोजी श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले,यात सांगवी मार्डी येथील ग्रामस्थांनी व तोष्णीवाल कुटुंबीयांनी पालखीचे पूजन करून जल्लोषात स्वागत केले,यात हनुमान तोष्णीवाल व रुक्मिणी तोष्णीवाल, डॉक्टर श्याम तोष्णीवाल,यांनी या अन्नदानाची सुरुवात केली होती,आज त्याला 35 वर्ष पूर्ण झाले असून तोष्णीवाल परिवाराने जरी या अन्नदानाची सुरुवात केली असली तरी, आज सांगवी मार्डी ग्रामस्थांचा यात खूप मोठा मोलाचा वाटा आहे असे प्रतिनिधीशी बोलताना तोष्णीवाल कुटुंबियांनी सांगितले,श्री गजानन महाराज पालखीच्या दर्शनासाठी सांगवी मार्डी सह पंचक्रोशीतून भाविक भक्त दाखल झाले होते,यावेळी सांगवी मार्डी गावचे सरपंच युवराज बागल, ग्रामस्थ,संपूर्ण तोष्णीवाल कुटुंबीय व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे श्री गजानन महाराज पालखीचे सोलापूर दिशेने प्रस्थान झाले.
0 Comments