तुळजापूर येथे दयावान चषक बक्षीस समारंभ संपन्न
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
तुळजापुर: तुळजापुर येथे दि,१७ रोजी झालेल्या दयावान चषक(तुळजापूर प्रीमियर लीग) मध्ये आजच्या अंतिम दिवसांमध्ये प्रथमतः सेमी फायनल चे सामने खेळवण्यात आले प्रथम सेमी फायनल हरीश रोचकरी इलेव्हन विरुद्ध दयावान रायडर्स या संघांमध्ये खेळवण्यात आला प्रथम फलंदाजी करताना हरीश रोचकरी इलेव्हन संघाने दयावान रायडर्स संघासमोर 8 षटका मध्ये 100 धावांचे आव्हान ठेवले होते या धावसंख्येचा पाठलाग करताना दयावान रायडर्स संघ प्रथमदर्शी सामना एकतर्फी जिंकेल असे वाटत असताना शेवटच्या षटकामध्ये 10 रन्सची आवश्यकता होती गोलंदाज श्रेयस कुतवळ याने उत्कृष्ट गोलंदाजी करून सामना दोन रन्सनी जिंकून दिला....
दुसरा सेमी फायनल हा गोलाई ग्रुप विरुद्ध ऐ. के अकॅडमी या संघांमध्ये झाला ए.के अकॅडमी संघाने गोलाई ग्रुप संघावर एकतर्फी विजय नोंदवून फायनल मध्ये प्रवेश केला शेवटी फायनल सामना हरीश रोचकरी इलेव्हन विरुद्ध ए.के अकॅडमी या दोन बलाढ्य संघामध्ये झाला या सामन्यात हरीश रोचकरी इलेव्हन या संघाने ए.के अकॅडमी संघावर एकतर्फी विजयाची नोंद केली व दयावान चषक पटकावला ...
बक्षीस समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तालुक्याचे लोकनेते मा. मधुकरराव चव्हाण साहेब व मराठी सिने अभिनेते उमेश बप्पा जगताप उपस्थित होते.मा.मधुकरराव चव्हाण साहेब यांनी उपस्थित खेळाडूंना खेळाचे महत्व सांगितले ..
प्रसंगी दयावान चषक मध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्रेयस कुतवळ तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून कृष्णा गवळी पात्र ठरले व अंतिम सामन्याचा सामनावीर कृष्णा गवळी हा ठरला विजेत्या संघाला अमोल भैया कुतवळ यांच्यातर्फे रोख रक्कम 61 हजार रुपये व दोन नंबरचे बक्षीस पवनराजे कदम यांच्यातर्फे रोख रक्कम 31 हजार रुपये द्वितीय आलेल्या संघाला मा.मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. मालिकावीर म्हणून कृष्णा गवळी याला सुहास गायकवाड यांच्यातर्फे सायकल भेट देण्यात आली..
बक्षीस समारंभास जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष मा. धीरज भैया पाटील,युवा नेते अमोल भैया कुतवळ ,ऋषिकेश मगर,रणजित इंगळे, सुनील पिंटू रोचकरी युसुफ भाई शेख, प्रा.रामलिंग थोरात सर संतोष पप्पू पवार ,बिरुदेव माने, बापू चव्हाण ,यांची उपस्थिती होती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सौदागर जाधव ,अजय धनके, ज्ञानदेव देवकर ,अक्षय पवार, आदित्य पवार ,प्रणव पवार, सलमान शेख ,विकी माने, औदुंबर करंडे, जफर शेख ,रितेश देवकर, कृष्णा पवार ,अक्षय दिवटे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कावरे सर यांनी केले.
0 Comments