दिलालापूर मारुती मंदिरात रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन यांच्या ग्लोबल ग्रँट प्रकल्पाचे लोकार्पण
प्रतिनिधी रुपेश डोलारे
धाराशिव: तोरंबा येथील दिलालपुर मारुतीच्या मंदिरात दि,१७ रोजीरो रोटरी क्लब ऑफ पुणे, गांधी भवन पुणे यांच्या ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून साकार झालेल्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. "मी दिलेल्या आर्थिक सहाय्यातून उस्मानाबाद मधील माझ्या भगिनींचे कष्ट काही प्रमाणात कमी झाले हे बघून आज मला अतिशय समाधान वाटते आहे." हे उद्गार पुण्याहून आलेल्या डॉ.दीपकजी भोजराज यांनी काढले. या प्रकल्पाच्या अंतर्गत तोरंबा, उदतपुर, हिप्परगा, सालेगाव आणि हराळी या गावांमध्ये ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्राच्या माध्यमातून ३५ विहिरींचे खोलीकरण, २५ जनावरांचे हौद आणि २ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी या प्रकल्पातील मुख्य देणगीदार डॉ.दीपक भोजराज, त्यांच्या कन्या अमृताताई देवगावकर, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनच्या अध्यक्षा पद्मजाताई जोशी सचिव अश्विनी ताई शिलेदार, बाकी सदस्य, रोटरी क्लब ऑफ उमरगा येथील माजी अध्यक्ष डॉ.दीपकजी पोफळे, श्री. सुधीरजी लातूरे तसेच तोरंबा येथील सरपंच श्री. यादव चव्हाण , उदतपुर येथील माजी सरपंच श्री. माधवराव पाटील , ज्ञान प्रबोधिनी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. अभिजित कापरे आणि ज्ञान प्रबोधिनीचे अन्य कार्यकर्ते, तोरंबा, उदतपुर, हिप्परगा गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते. पुण्यातील पाहुण्यांनी कार्यक्रमापूर्वी तोरंबा गावात जाऊन प्रत्यक्ष विहिरी, हौद आणि पाण्याच्या टाकीची पाहणी केली.
0 Comments