एच.पी.एल ( H.P.L ) कंपनीच्या वतीने दुकानदारासाठी संवाद मेळावा संपन्न
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
धाराशिव : धाराशिव येथे ( दि.१५) रोजी " HPL ELELTRIC & POWER LTD " द्वारे एप्पल हॉटेल प्रा.लि. उस्मानाबाद मध्ये संवाद मेळावा कार्यक्रम अंबिका इलेक्ट्रिकल्स सेल्स अँड सर्व्हिसेस,तुळजापूरचे शुभम हिबारे आणि सिद्धेश्वर एंटरप्रायझेचे अप्पू स्वामी,सोलापूर अंतर्गत हा मेळावा करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रमोद कुमार, DGM - Sales (consumer head) हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ही प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद कुमार यांचा सत्कार इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन उस्मानाबादचे अध्यक्ष बालाजी साळुंके यांनी पुष्पगुच्छ,श्रीफळ,शाल व आई तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कंपनीच्या वतीने श्री.बिभूती कुमार,वरिष्ठ व्यवस्थापक (lighting head),श्री.दिनेश उळागङङे,श्री.अल्ताफ अत्तार हे उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये लाइटिंग,वायर आणि केबल्स,MCB,DB आणि मॉड्युलर स्विचेस सारखी सर्व ग्राहक उत्पादने प्रदर्शित करण्यात आली होती.
तरी दुकानदारांसाठी फंक्शन दरम्यान बँकॉक आणि गोव्याच्या दोन योजना सुरू केल्या आहेत ज्यात ५० व्यावसायिक भागीदारांनी त्या योजनांतर्गत स्वतःची नोंदणी केली आहे. सर्व सहभागी परदेशी दौऱ्याबद्दल खूप आनंदी आणि उत्साही होते.फंक्शन दरम्यान श्री.प्रमोद कुमार यांनी आगामी काळात ग्राहकांच्या मागणीनुसार नवीन लाइटिंगची नवीन उत्पादने लॉन्च करण्याच्या दिशेने कंपनीच्या विचारांची माहिती दिली. तसेच कंपनी संदर्भात प्रमोद कुमार बोलताना असे सांगितले की एच.पी.एल ( H.P.L ) कंपनी ही महाराष्ट्र मध्ये मीटर उद्योगांमध्ये अग्रेसर आहे.मीटर उद्योगांमध्ये आशियात नंबर वन ची कंपनी आहे.नवीन घरामध्ये शोभा वाढवण्यासाठी एचपीएल ( H.P.L ) कंपनीचे लाइट्स एलईडी हा एक उत्तम पर्याय ग्राहकाकडून मानला जात आहे.तर कंपनीमध्ये सर्वात मोठी पॉझिटिव्ह गोष्टी ही आहे की संपूर्ण भारतामध्ये एचपीएल ( H.P.L ) कंपनीमध्ये फक्त ३ टक्के रिप्लेसमेंट येत आहे.सर्व HPL कंपनीचे कारखाने हे सोनीपत.चंदिगड जाबलि हायवे लगत आहे. तर महाराष्ट्र मध्ये मुंबई,पुणे,नागपूर अशा ठिकाणी ब्रांच व वेअर हाऊस आहेत.
मेक इन इंडिया कार्यक्रमातही योगदान देत असलेल्या कंपनीने आत्तापर्यंत नवीन उत्पादने आणि नवीन तंत्रज्ञान समाविष्ट करण्यावरही त्यांनी भर दिला जात आहे.कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्वांना एचपीएल ( H.P.L ) कंपनीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. शेवटी कार्यक्रमाचा समारोप झाला इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन उस्मानाबादचे अध्यक्ष बालाजी साळुंके यांचे आभार मानले.
0 Comments