Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणा-या दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना ई-रिक्षा भेट स्वरुपात देवून मंदिर संस्थानला सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे| The temple institute should be supported by giving e-rickshaw as a gift to the disabled and senior citizens who come for the darshan of Shri Tuljabhavani Mata-

श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणा-या दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना ई-रिक्षा भेट स्वरुपात देवून मंदिर संस्थानला सहकार्य करावे-                                          जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे|


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


उस्मानाबाद,दि,23:- श्री.तुळजाभवानी मंदिर तुळजापूर हे महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व असलेले साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण शक्तीपीठ असून देशभरातील लाखो भाविक भक्तगण श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात. यामध्ये दिव्यांग, जेष्ठ नागरिकही मोठया संख्येने दर्शनासाठी येत असतात, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना श्रीदेविजींच्या दर्शनाला जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी ई-रिक्षाची सुविधा देणे आवश्यक आहे.

 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर मार्फत दिव्यांग, जेष्ट नागरिकांसाठी ईलेक्ट्रीक वाहन ई-रिक्षा (तीन चाकी किंवा चारचाकी) भेट स्वरुपात देणगी म्हणून देण्याकरिता सार्वजनिक आवाहन करत आहोत. आम्ही व्यक्ती, समुदाय संस्था आणि व्यवसायिक यांना याव्दारे आवाहन करत आहोत या सामाजिक कार्याकरिता आपला सक्रीय सहभाग नोंदवावा.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

ई-रिक्षा देणगी देऊन तुम्ही श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणा-या दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना मदत म्हणून तुम्ही थेट तुमचे योगदान म्हणून ई-रिक्षा भेट स्वरुपात देवून मंदिर संस्थानला सहकार्य करावे. ई-रिक्षा भेट दिल्यास तुमच्या अनमोल कार्याची पोहच पावती म्हणून आम्ही श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर वेब साईट सोशल मिडीया आणि मंदिराच्या कार्यक्रमादरम्यान सर्व देणगीदारांना प्रसिध्दी देण्यात येईल. आपली भेट ही दिव्यांग, जेष्ट नागरिक भाविकांच्या सेवेसाठी अनमोल योगदान ठरणार आहे.

ई-रिक्षा भेट स्वरुपात देणगी देवून किंवा त्यांच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देवून या उदात्त कार्यात हातभार लावण्यास स्वारस्य असेल तर आपण कृपया आमच्याशी shreetuljabhavanitemple@gmail.com किंवा मोबाईल नंबर 9421357957 वर संपर्क करावा. आम्हाला खात्री आहे की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर हे दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांच्या सेवेसाठी अर्पण केलेली मदत ही अतुलनीय ठरेल व श्रीदेविजींची सेवा करण्याची आपणास अमुल्य संधी मिळेल. श्रीदेविंजींच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला योगदान द्यावे. याव्दारे दानशुर भाविकांना मंदिर समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments