Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न .

 सोलापूर शहर जिल्हा महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न .

प्रतिनिधी रुपेश डोलारे सोलापुर 


सोलापुर दि.२३  - महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या निर्देशानुसार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणितीताई शिंदे व सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर व जिल्हा महिला काँग्रेसची महत्वाची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश महिला काॅग्रेसच्या प्रभारी शिलाताई उंबरे-पेंढारकर, सहप्रभारी स्वातीताई शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली.


यावेळी मोदी सरकारच्या राजवटीत त्यांच्या भांडवलशाही धोरणामुळे महागाई, बेरोजगारी व महिलांवरील अत्याचारांच्या घटना प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त महिला निवडून आल्या पाहिजे यासाठी कामाला लागावे. युवकांची माती भडकावून जाती धर्मात तेढ निर्माण करत आहेत. सरकारी उद्योग विकले जात आहेत. अदानी, अंबानी व इतर उद्योगपतींना फायदा करण्याचे  धोरण मोदी सरकार राबवित आहे.  त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा कठीण काळात भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद केला‌ आहे. तसेच कर्नाटकमध्ये जनहिताचे पाच महत्त्वाचे आश्वासने देऊन निवडणूका लढविल्या. तर निवडणुका जिंकल्या  नंतर महागाई, बेरोजगारी, गॅस सिलेंडरचे दर कमी करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. तसेच महिलांचे दुःख व अडचणी महिला चांगल्या प्रकारे समजू शकते म्हणून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत व महानगर पालिका निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाच्या महिला निवडून आणण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन सोलापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी उषाताई कांबळे यांनी केले.

तर काँग्रेस पक्षाच्या कठीण काळामध्ये राहुल गांधी यांनी देशभर फिरून झंझावत निर्माण केला. शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ व कसबा विधानसभा निवडणुकीत व कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यामुळे येणारा काळ हा काँग्रेस पक्षास अतिशय चांगला असून आगामी निवडणुकीत एकनिष्ठ व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिलांनाच निवडणूकीत काँग्रेस पक्ष संधी देणार असल्याची ग्वाही सोलापूर शहर काँग्रेसच्या प्रभारी शीलाताई उंबरे - पेंढारकर यांनी दिली‌. 


यावेळी शहर व जिल्हा  महिला काँग्रेसच्या सहप्रभारी स्वातीताई शिंदे, महिला प्रदेश सचिव सुमन जाधव, जिल्हाध्यक्ष शाहिन शेख, लताताई गुंटला, शिल्पाताई चांदणे, प्रमिलाताई तुपलवंडे, मुमताज तांबोळी, अनिता भालेराव, मीना गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन माजी शहराध्यक्षा करीमुन्नीसा बागवान यांनी केले. यावेळी शहर महिला काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्ष कार्यकारणी पदाधिकारी शोभाताई बोबे, प्रमिलाताई तुपलवंडे, शिल्पाताई चांदणे, संध्याताई काळे,  शबाना तांबोळी, चंदा काळे, बसंती साळुंके, स्नेहल शिंदे, सुनीता शेरखाने, सुनिता बेरा, निता बनसोडे, लता सोनकांबळे, सुनीता व्हटकर, विमल जाधव, सविता सोनवणे, मीना गायकवाड, अनिता भालेराव, हिना नदाफ, वीणा देवकते, नुसरत शेख, आशा कांबळे, अध्यक्ष शेख भगरे, रुकिया बिराजदार यांच्यासह महिला कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments