Hot Posts

6/recent/ticker-posts

काटी येथील जिल्हा परिषद प्रशालेचे शालांत परिक्षेत घवघवीत यश !Zilla Parishad Prashala in Kati was successful in school examination!

 काटी येथील जिल्हा परिषद प्रशालेचे  शालांत परिक्षेत घवघवीत यश !




===================================

तुळजापुर.- महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च एप्रिल  २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यात तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जि.प.प्रशाला (हायस्कुल) चा इयत्ता दहावीचा निकाल ८१℅ लागला असून हायस्कूलने यंदाही उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.

या निकालामध्ये एकूण २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.    प्रथम श्रेणी ८ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी १०,तृतीय श्रेणी ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम प्रथम. कु. काळे समर्थ सुरेश ७३.६०℅, द्वितीय. कु. साळुंके स्वास्तिक आप्पासाहेब ७२.६०℅ ,  तृतीय हंगरकर आदित्य मनोज ६७.८०℅ , चतुर्थ चिवरे ज्ञानेश्वर अनंतरा ६४.८०℅अनुक्रमे उत्तीर्ण झाले आहेत.

गुणवंत व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे   अभिनंदन शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक,  शिक्षकत्तेर कर्मचारी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments