Hot Posts

6/recent/ticker-posts

भारत राष्ट्र समिती सदस्य नोंदणीला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद.

भारत राष्ट्र समिती सदस्य नोंदणीला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात भारत राष्ट्र समिती पक्षाची सदस्य नोंदणी चालू असून पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते गावागावातील चौका चौकात, घरातपर्यंत शेतात जाऊन जनजागृती करत आहेत. 

       शुक्रवार(दि.23 जून) रोजी धाराशिव तालुक्यातील खेड व खामगाव या दोन्ही गावात भारत राष्ट्र समितीचे मराठवाडा अध्यक्ष सोमनाथ थोरात यांच्या उपस्थितीत जिल्हा समन्वयक रामजीवन बोंदर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

     यावेळी बोलताना बोंदर म्हणाले की धाराशिव जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे. त्यास सरकारचे धोरण कारणीभूत आहे. आपला जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून भारतभर आपली ओळख ठेवण्याचे पाप येथील राजकारण्याने केला आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही योजना येथे व्यवस्थित राबविल्या जात नाहीत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात सुद्धा आपणाला पाणी ,वीज जर हे देऊ शकत नसतील तर हे किती कर्तृत्ववान आहेत हे यातून आपल्याला दिसून येत आहे .हजारो शेतकर्‍यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केली आहे. शेतकर्‍यांना वीज, पाणी, बी-बियाणे, शेती अवजारे यामध्ये सवलत दिल्यास भारत देश सुजलाम्-सुफलाम होणार आहे. म्हणूनच यावेळेस अब की बार किसान सरकार हा नारा देऊन भारत राष्ट्र समिती मैदानात उतरली आहे. तेलंगणा राज्यातील शेतकरी सुखी होत असेल तर त्या राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळणार्‍या सुविधा का मिळू शकत नाहीत? असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजुरांच्या कल्याणासाठीच भारत राष्ट्र समिती आता लढा देणार असून इथून पुढे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे कल्याण करून घ्यायचे असेल तर ग्रामपंचायत ,पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा यासह सर्व निवडणुकीत भारत राष्ट्र पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे यावेळी उपस्थित जनसमुदायाला सांगितले. त्यांची ही भूमिका सर्वसामान्य जनतेला पटू लागल्यामुळे भारत राष्ट्र समितीच्या सदस्य नोंदणीला भरभरून प्रतिसाद देऊन पक्षाच्या पाठीमागे उभा राहण्याचा निर्धार लोकांनी बोलून दाखविला. 

यावेळी त्यांच्यासोबत अर्चना अंबुरे शशिकांत बेगमपुरे ज्ञानेश कामतीकर ,रामराजे गरड, शिवाजी गरड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments