जिल्हा पोलीस दल व कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने भातंब्री परिसरात वृक्षारोपण
तुळजापुर : जिल्हा पोलीस दल आणि कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्ट, तुळजापुर यांच्या संयुक्त विद्यमाने दि,९ रोजी भातंब्री आणि रायखेल डोंगरमाळावर 1500 वृक्ष लागवड करण्यात आले. वड, पिंपळ, लिंब, चिंच, सिताफल, गुलमोहर, पांगीरा, बांबू, बदाम, अशा समाज उपयोगी एकुण वीस प्रजातीची झाडे लावण्यात आली. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठीउस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक, मा. श्री. अतुल कुलकर्णी,(IPS) जैविक कृषी तज्ञ मा. श्री.अभय मुतालीक देसाई,सहाय्यक जिल्हा अधिकारी मा. प्रियंवदा(IAS), टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे अधिकारी मा. गणेश चादरे, कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ.दयानंद वाघमारे, तुळजापूर पोलीस विभागातून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. कांबळे, श्री. चास्कर, श्री. भराटे, पोलीस उपनिरीक्षक श्री बांगर, श्री चनशेट्टी व मंजुळे मॅडम मान्यवर उपस्थितीत होते.या कार्यक्रमात बोलताना अभय मुतलिक म्हणाले की, पर्यावरणसमतोल राहण्यासाठी वृक्ष लागवड करुन ती संवर्धन करण्याची आज काळाची गरज आहे. आणि गावागावात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी निसर्ग प्रेमीसमाज तयार झाला पाहिजे असे प्रतिपादन केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. आतुल कुलकर्णी हे म्हाणाले की, उस्मानाबाद जिल्हा हा एक आदर्श जिल्हा बनवण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने वृक्षारोपणाची मोहिम आखण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. उपजिल्हाधिकारी प्रियवंदा यांनी वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले. वृक्षारोपणासाठी भातंब्री गावाचे ग्राम पंचायत, इंदिरा कन्या हायस्कुल, मंगरुळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातंब्री, राजे शिवछत्रपती क्रिकेट क्लब यांच्या वतीने श्रमदान करण्यात आले. स्वागत मा. डॉ. दयानंद वाघमारे तर सुत्रसंचालन मनोहर दावणे यांनी केले.
0 Comments