Hot Posts

6/recent/ticker-posts

ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर निवास , भोजनासाठी रक्कम तात्काळ अदा करा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे लोहारा तहसीलदार यांना निवेदन

ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर निवास , भोजनासाठी  रक्कम  तात्काळ अदा करा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे लोहारा तहसीलदार यांना निवेदन
उस्मानाबाद:  नागपूर येथे झालेल्या मागील हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर निवास व भोजनासाठी एक रकमी रक्कम देण्यासंदर्भातली योजना जाहीर केली. मात्र अजूनही त्याचा शासकीय निर्णय आला नाही. ओबीसी समाजाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ही योजना अत्यंत महत्वाची आहे. सत्र 2023-24 ला जून महिन्यापासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा शासन निर्णय लवकर निघाल्यास या सत्रापासून शिक्षण घेणाऱ्या गरीब ओबीसी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल व आपण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाप्रती संवेदनशील आहे हे देखील त्यातून सिद्ध होईल. अन्यथा ओबीसी विद्यार्थी आशेवरच वाट पाहत राहतील. कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही.कृपया आपल्या सरकारने दिलेला शब्द पाळावा व तमाम गरीब ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले  आहे.

या निवेदनावर,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार,संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाप्रमुख शिवश्री बालाजी भागवत यादव,संभाजी ब्रिगेड प्रसिद्धी प्रमुख शिवश्री स्वप्निल बालाजी गुंड संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष शिवश्री खंडू शिंदे, संभाजी ब्रिगेड वाहतूक आघाडी तालुका अध्यक्ष शिवश्री शरद जावळे, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष शिवश्री सत्यजित मुसांडे ,संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी तालुका अध्यक्ष शिवश्री अमोल बिराजदार , संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री पदमाकर चव्हाण, संभाजी ब्रिगेड महासचिव शिवश्री लक्ष्मण पवार ,संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष शिवश्री अभिजित सुर्यवंशी, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष शिवश्री किशोर बिराजदार ,संभाजी ब्रिगेड तालुका सचिव शिवश्री विजय जाधव, संभाजी ब्रिगेड तालुका सहसचिव शिवश्री ओमकार चव्हाण ,संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी तालुका उपाध्यक्ष शिवश्री अब्बास कारभारी, संभाजी ब्रिगेड तालुका सचिव शिवश्री लक्ष्मण लोहार ,संभाजी ब्रिगेड सोशल मीडिया सचिव शिवश्री गणेश सुरवसे, संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी तालुका उपाध्यक्ष शिवश्री अनंत पवार , संभाजी ब्रिगेड तालुका संघटक शिवश्री संजय खरूसे,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



Post a Comment

0 Comments