मराठवाडा मुक्तीसंग्राम मधील हुतात्मा श्रीधर वर्तक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व वृक्षारोपण संपन्न
उस्मानाबाद,दि,06 :- तुळजापूर तालुक्यातील अपसिंगां येथे मराठवाडा, हैद्राबाद मुक्ती संग्रामातील थोर हुतात्मा श्रीधर विनायक वर्तक यांची जन्म शताब्दी दि.५ बुधवार रोजी शहीद झालेल्या ठिकाणी त्यांचे वशंज पुतने श्रीधर वर्तक,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, उस्मानाबादचे तहसीलदार शिवानंद बिडवे, तुळजापूर तहसीलदार अरविंद कोळगे,गटविकास अधिकारी ताकभाते,नगरपालिका तुळजापूर चे मुख्याधिकारी कुंभार,तुळजापूर पोलीस स्टेशन चे API कांबळे, स्वातंत्रसैनिक बुबासाहेब जाधव, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमोहोत्सव समीतीचे जिल्हा संयोजक युवराज नळे इतिहास संशोधक प्रा.सतीश कदम, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीचे तुळजापूर तालुका संयोजक साहेबराव घुगे, लोहारा तालुका संयोजक मुरलीधर होनाळकर, प्रा.गणेश जळके, शीला उंबरे, राजाभाऊ कारंडे, जयराज खोचरे, ग्रामविकास अधिकारी सुरवसे, सरपंच अजीत क्षिरसागर, उपसरपंच राहुल साठे, मुख्याध्यापक सुर्यवंशी, बालाजी पांचाळ सह युवक गावकरी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सकाळी गावलगत असलेल्या टेकडीवर श्रीधर वर्तक याच्यां समाधीस्थळी जाऊन श्रीधर वर्तकांचे वंशज पुतने श्रीधर वर्तक व त्याच्यां परीवाराच्या हस्ते पुष्प चक्र अर्पण करून. ईतरही सर्व शासकीय अधिका-यानी त्यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण केले.व हुतात्मा श्रीधर वर्तक अमर रहे अश्या घोषणा दिल्या,राष्ट्रगीत म्हंटले, सर्वजण गावातील हुतात्मा स्मारकामधे येऊन सत्कार समारंभानंत्तर गावातील स्वातंत्र्य सैनिकांच्यां वंशजाचाही सत्कार करण्यात आला. बुबासाहेब जाधव, युवराज नळे, सतीश कदम यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा ईतीहास व हुतात्मा श्रीधर वर्तकांची माहीती सांगीतली,तुळजापूर व धाराशिव तालुक्यातील हुतात्मा स्मारकांचे जतन दुरूस्ती व देखरखाव करण्यासाठी वरीष्ठ अधिका-यानी आदेश दिले.तसेच प्रमुख पाहुण्याच्या हस्ते ७५ वृक्षांची लागवड केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय क्षिरसागर तर प्रास्ताविक मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीचे राहुल गोरे यांनी केले. या वेळी बिट अमंलदार चौधरी, राऊत,सह मंडल अधिकारी गांधले,माजी सैनिक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार,विद्यार्थी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments