Hot Posts

6/recent/ticker-posts

अनुसूचित जातीच्या आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याना वेतना बाबतच्या पाठपुराव्याला यश

अनुसूचित जातीच्या आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याना वेतना बाबतच्या पाठपुराव्याला यश 

=====================


उस्मानाबाद :अनुसूचित जाती आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा डी.डीओ कोड करिता व एन.टी. विभागातून एस.सी सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यासाठी मंत्रालयात अनेक दिवसापासून फाईल सादर करण्यात आली होती. वारंवार  सदरील फाईल चा पाठपुरावा श्री.सचिन बनसोडे सर मुख्याध्यापक बर्दापूर आश्रम शाळा  यांनी मंत्रालय जाऊन पाठपुरावा केले. त्यानंतर दिनांक 5.जुलै 2023 रोजी.. अनुसूचित जाती शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रदेश सचिव श्री ईश्वर क्षीरसागर यांनी माननीय माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेबां यांच्या पुढाकाराने सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव साहेब डिगळे साहेब व आवरसचिव श्री अहिरे साहेब यांच्यासमोर फाईल घेऊन फाईल वरती मंजुरी घेण्यात आली. 

यानंतर सदरील फाईल कोटे साहेबाकडे सादर करण्यात आली. दि, 6. जुलै रोजी श्री ईश्वर क्षीरसागर यानी  कोटे साहेबाकडून फाईल तयार करून आयआयटी चे श्री कैलास मुंडे साहेब यांच्याकडे सादर करण्यात आली .  यानंतर माननीय मुंडे साहेबाकडून फाईल तयार करून  दिव्यांग विभाग श्रीमती कडू मॅडम कडे सायंकाळी 5 वाजता सादर करण्यात आली. सदर फाईल मुंडे साहेब व श्रीमती कडू मॅडम यांच्याकडून तयार करून 6.वाजता उपसचिव श्री घोडके साहेब यांच्याकडे सादर करण्यात आली. सायंकाळी 6.30. वाजता माननीय उपसचिव घोडके साहेब यांची भेट घेऊन फाईल वरती सही घेऊन मंजूर करण्यात आली. सायंकाळी 7.वाजता सदर फाईल. एन.टी विभागाकडून सामाजिक न्याय एस.सी विभागाकडे वर्ग करून मंजूर करून अप्रोल घेऊन मेल करण्यात आला. 


 आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादा मुळे मला हे काम करणे शक्य झाले यश आले. आनंद वाटला  यापुढे संघटनेच्या वतीने मोठ्या जोमाने सर्वजन मिळून काम करूया.  

.......आपला स्नेहांकित.....

श्री ईश्वर क्षीरसागर.सर.. प्रदेश सचिव अनुसूचित जाती आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य.

Post a Comment

0 Comments