पोलीस कर्तव्य मेळाव्यात सुवर्ण रजत पदक विजेते अधिकारी- अंमलदार यांचा सत्कार.
उस्मानाबाद: पोलीसांची व्यावसायीक नेपुण्य, गुण्वत्ता कौशल्य कार्यक्षमता व दर्जा वाढविणे व त्याची पडताळणी करणे याकरिता प्रत्येक वर्षी पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने दि. ३ रोजी ते दि,५ या कालावधीत मा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक, औरगांबाद परिक्षेत्र, औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली १८ वा और्रगाबाद परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा-2023 चे आयेजन पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद ग्रामीण येथील गोकुळ पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, येथे आयोजित करण्यात आले होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील 4 अधिकारी व 21 अंमलदार यांनी पोलीस कर्तव्य मेळावा 2023 मध्ये भाग घेवून उस्मानाबाद संघास 06 सुवर्ण पदक तर 05 रजत पदक प्राप्त करुन उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाचे टिमने उपविजेते पद पटकावले.
तसेच उस्मानाबाद जिल्हा पोलीस संघाचे खालील अधिकारी व अंमलदार यांनी पुढील श्रेणी ज्यामध्ये 1) शास्त्रशुध्द पध्दतीने तपास 2) न्यायवैद्यक शास्त्र लेखी परिक्षा, 3) गुन्हे तपास, 4)फौजदारी कायद्याचे कलम, न्यायालयीन निर्णय, 5)लेबलिंग, पॅकिग, 6) फोटोग्राफी टेस्ट या विषयामध्ये सांघक परिक्षा घेण्यात आल्या. त्यामध्ये स.पो.नि. शांतीलाल चव्हाण, उस्मानाबाद यांना (सुवर्ण पदक), तर निरीक्षण चाचणी मध्ये वाय.सी. मंडोळे उस्मानाबाद यांना (सुवर्ण पदक), पोलीस पोर्टेट चाचणी- एल. पी. पाटील उस्मानाबाद (रजत पदक), पोलीस फोटोग्राफी स्पर्धा एच. एफ. शेख, उस्मानाबाद (सुवर्ण पदक), तर पोलीस व्हिडीओग्राफी स्पर्धा शंकर शिंनगरवाड (रजत पदक), संगणक कौशल्य क्षमता- ए.एस. मोरे. उस्मानाबाद, (रजत पदक) तर अम्ली पदार्थ तपासणी मध्ये डॉग कॅप्टन हस्तक एस. पी. वडणे, एस.सी. शाहीर उस्मानाबाद (रजत पदक) श्वान क्षमता चाचणी मध्ये डॉग रॅम्बो उस्मानाबाद हस्तक एस.एम. कसपटे व अभय गणेश यांना ट्रॅकिंग मध्ये (सुवर्ण पदक) असे एकुण उस्मानाबाद संघास 06 सुवर्ण पदक तर 05 रजत पदक प्राप्त करण्यात यश मिळाले आहे. या मध्ये उपविजेते पद उस्मानाबाद यांनी पदकावले आहे.
आज दि,७ रोजी पोलीस मुख्यालयातील सभागृहात मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. नवनीत काँवत यांच्या हस्ते सदर अधिकारी व अंमलदार यांचा पदक व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
सदर सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हा पोलीस संघाने केली आहे.
0 Comments