महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले संदेश माने यांचा आंबेडकरी चळवळीच्या वतीने सत्कार
उस्मानाबाद : शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आंबेडकरी चळवळीच्या विविध संघटना आणि पक्षाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले भीमनगर उस्मानाबादचे सुपुत्र संदेश कल्याण माने यांचा दिनांक ७ जुलै रोजी पुष्पगुच्छ देऊन, फेटा बांधून आणि पेढे वाटप करून सत्कार करण्यात आला. यावेळी रिपाईचे ( आठवले) पक्षाचे जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेसा जानराव, भीमशक्ती महिला आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष जयमला सावंत , रिपाई खरात गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत , सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड, रिपाईचे शहराध्यक्ष उदय बनसोडे, बहुजन स्वाभिमान संघटनेचे उस्मानाबाद चे तालुकाध्यक्ष समाधान सरवदे, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष संदिपान कांबळे भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष संदीप अंकुशराव, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शितोळे, श्रीकांत गायकवाड, नितीन बनसोडे, निलेश माने, अजिंक्य बनसोडे आदींची उपस्थिती होती.
माने सरांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी रिपाईचे सोमनाथ गायकवाड आणि सर्व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments