कळंब येथील शेतकऱ्याची मुलगी राणी हनुमंत माळी हिचे एम पी एस सी मध्ये घवघवीत यशउस्मानाबाद: बोरगाव बुद्रुक तालुका कळंब येथील शेतकऱ्याची मुलगी कुमारी राणी हनुमंत माळी हिने एम पी एस सी मध्ये यश संपादन केले .
डिकसळ येथील समता इंग्लिश स्कूल, जय क्रांती प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आणि समता परिवार यांच्यावतीने कुमारी राणी हनुमंत माळी या मुलीने एम पी एस सी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केले, ओबीसी महिला मधून राज्यात 33 वा क्रमांक मिळवला, तसेच कुमारी संकीता अरुण माळी हिने एन एम एम एस उत्तीर्ण झाल्याबद्दल व तन्मय भरत शिंदे यांने मॅथ ओलंपिक मध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल आणि तेजस्विनी भरत शिंदे यांनी स्कॉलरशिप आठवी मध्ये उत्तीर्ण झाल्याने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र खडबडे,टी.जी माळी साहेब , शिंदे सर, गरड सर, संतोष भोजने सर ,अरुण माळी,मोहन पौळ ,धोंगडे सर,अनिल शेळके सर ,बिभीषण यादव,शांतनू माळी, रामदास खडबडे , भरत शिंदे, रमेश शिंदे सर,बालाजी राऊत सर, तसेच संस्थेच्या सचिव श्रीमती सरोजा आगरकर मॅडम, सौ जयश्री अरुण माळी, साक्षी माळी, अंकिता माळी, शिंदे मॅडम, श्रीमती जनाबाई खडबडे, सौ.मीराबाई खडबडे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भोजने सर यांनी केले, तसेच गरड सर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ,आणि प्राध्यापक राजेंद्र खडबडे यांनी हि मार्गदर्शन करून आभार प्रदर्शन केले
0 Comments