Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील श्री श्री गुरुकुल येथे लोकशाही पद्धतीने निवणुकीचे आयोजन

तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील श्री श्री गुरुकुल येथे लोकशाही पद्धतीने निवणुकीचे आयोजन

अणदुर : तुळजापूर तालुक्यातील अणदुर  येथे श्री श्री गुरूकुल येथे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया काय असते, ती लोकशाही पद्धतीने कशी पार पाडली जाते इ गोष्टीची माहिती विद्यार्थी दशेत मिळावी यासाठी शालेय स्तरावरती निवडणुकीचे आयोजन दि,२६ रोजी करण्यात आले होते. यात इयत्ता पाचवी ते दहावी च्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. मतदान झाल्यानंतर कोण निवडून येणार यासाठी मुलांमध्ये खूप मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. निकालानंतर मुलांनी आनंदोत्सव साजरा केला त्याच बरोबर आपल्या प्रतिक्रिया सुद्धा नोंदवल्या. यासाठी निवडणूक प्रमुख म्हणून रामेश्वर सावंत यांनी काम पाहिले.हि निवडणूक प्रक्रिया शांत आणि लोकशाही पद्धतीने पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक शिवराज भुजबळ, पुष्पा लामतुरे,ज्ञानेश्वर बंडगर, भाग्यश्री गोरे, मंजुषा जोशी, अनुजा कुलकर्णी, दशरथ शिंदे, दादाराव घोडके यांनी परिश्रम घेतले.विजयी झालेल्या सर्व विद्यार्थी उमेदवारांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ जितेंद्र भैय्या कानडे, मुख्याध्यापक लक्ष्मण नरे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments