Hot Posts

6/recent/ticker-posts

आश्रम शाळेवरील अधीक्षकाने सात वर्षीय विद्यार्थ्यांना केली बेदम मारहाण, तुळजापूर तालुक्यातील घटना

आश्रम शाळेवरील अधीक्षकाने सात वर्षीय विद्यार्थ्यांना केली बेदम मारहाण, तुळजापूर तालुक्यातील घटना
तुळजापूर  : आश्रम शाळेवरील अधीक्षकाने शाळेतील सात वर्षीय  विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळा येथे घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की योगेंद्र भिमसेन गिरसे,  अधीक्षक संत गाडगेबाबा आश्रम शाळा मंगरुळ यांनी  दि.13.05.2023 रोजी 17.30 वा. सु. संत गाडगेबाबा आश्रम शाळा मंगरुळ येथील- विद्यार्थी  ऋषी अमोल शिंदे, वय 7 वर्षे व संदीप शिवाजी कांबळे या दोघांना क्श्रुरपणे वागणूक देवून त्यांना प्लास्टीकच्या पाईपने, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ईश्वर मल्हारी क्षिरसागर, वय 52 वर्षे, धंदा नोकरी, रा.धारीवाल टाउनशिप तुळजापूर, जि. उस्मानाबाद यांनी दि.16.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324 सह बालकाची काळजी व संरक्षण कायदा कलम  75, 82(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments