Hot Posts

6/recent/ticker-posts

माळुंब्रा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक कामावर रुजू होत नसल्याने गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापुर यांना निवेदन ,ग्रामसेवकाअभावी ग्रामस्थांची कामे खोळंबली प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

माळुंब्रा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक कामावर रुजू होत नसल्याने  गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापुर यांना निवेदन ,ग्रामसेवकाअभावी ग्रामस्थांची कामे खोळंबली


 प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा ग्रामपंचायतचा ग्रामसेवक कामावर रुजू होत नसल्याने ग्रामस्थांची कामे खोळंबली असून त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, हा उपरोक्त प्रश्न लक्षात घेऊन उपसरपंच गजानन नवनाथ वडणे, ग्रामपंचायत सदस्य ललिता सुरेश वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य सपना शरद वडणे यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती तुळजापुर यांना निवेदनाद्वारे ग्रामसेवक पदभार  स्वीकारत नसलेबाबत निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनावर असे म्हटले आहे माळुंब्रा गावचे नवीन ग्रामसेवक म्हणून श्री इंगळे एस बी यांची नियुक्ती दिनांक 13-07- 2023 पासून निघालेली होती, परंतु आजच्या तारखेपर्यंत देखील श्री इंगळे यांनी चार्ज स्वीकारलेला नाही त्यामुळे गावातील नागरिकांचे हाल होत आहेत. तरी श्री इंगळे यांना त्वरित चार्ज घेण्यास सांगण्यात यावे, तसेच गावातील विकास कामे ही मागील सरपंच काळातील इस्टिमेटच्या उपयोगाने कामे  सुरुवात करण्यात येत आहेत. सरपंच व मागील बदली झालेला ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे कामे चालू करण्यात येत आहेत. गावातील निधी खर्चाबाबत आम्हाला कोणत्याही कल्पना अथवा विचारात न घेता मनमानी कारभार होत असून ही कामे त्वरित थांबवण्याचे आदेश  देण्यात यावा. गावातील ग्रामनिधीचा पैसा सिमेंट रस्ते करण्यासाठी करण्यात येत आहे. तरी ग्रामनिधीची रक्कम ही योग्य कामासाठी वापर व्हावा असे निवेदनात म्हटले आहे.



Post a Comment

0 Comments