Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीत नाना पाटलांचे महत्त्वपूर्ण योगदान - प्राचार्य डॉ एस एम मणेर

महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीत नाना पाटलांचे महत्त्वपूर्ण योगदान - प्राचार्य डॉ एस एम  मणेर        

प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव

 
तुळजापुर : येथील  तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी ते म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाचे नांव म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील होय. ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीस आव्हान देण्यासाठी क्रांतिकारक मार्गाचा अवलंब केला.१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीतचे कार्य करण्यासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. ग्रामीण जनतेला गुलामगिरी ची जाणीव करून दिली. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती.प्रतिसरकारच्या माध्यमातून त्यांनी लोकन्यायालय, अन्नधान्य पुरवठा इ. लोकोपयोगी कामे केली. नानांच्या जीवनावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचार धारेचा आणि राजश्री शाहू महाराजांच्या कार्याचा प्रभाव होता.प्रतिसरकारास पत्रिसरकार म्हणूनही ओळखले जात असे. या  कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व गुरूदेव कार्य करते व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा. डाॅ. मंत्री आडे यांनी केले तर आभार प्रा जे. बी क्षिरसागर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments