पोलीस प्रशासन कळंब व सकल कळंबकर यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन आनंदोत्सव साजरा केला
दि,३ रोजी वृक्ष लागवडीत सकल कळंब करांचा सहभाग व प्रसार होणे करीता कळंब शहरात वृक्षदिंडी काढण्यात आली होती. त्यामध्ये 3000 ते 4000 सकल कळंबकरांनी सहभाग घेवून वृक्ष लागवडीचे व संवर्धनाचे महत्वं व इतक्या मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलांचा व लोकांचा सहभाग मुलांसाठी प्रेरणा दायी ठरला. दि.04.08.2023 रोजी पुर्वसंध्येवासून वृक्ष लागवडीची जसत्त तयारी करण्यात आली होती. प्रतेक खड्याजवळ नियोजित वृक्ष ट्रि गार्ड, काळी माती, सुतळी व प्रत्येक सेक्टंरमध्ये पाण्याचे टूकर वृक्षासाठी पोहोच करण्याची कार्यवाही पाहटे पर्यत सुरु होती. यानंतर सकाळी वृक्ष लागवडी संदर्भात घेवयाची काळजी व नियोजन याची माहिती शहरातील विविध रस्त्यावरुन भोंगा लावून देण्यात येत होती. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे पुजन व साक्षीने ठिक 11.11 मिनिटांनी पुर्व नियोजना प्रमाणे राष्ट्रगीतास प्रारंभ होवून सकल कळंबकर व आजुबाजूचे नागरीकांनी सहभाग घेवून त्या ठिकाणी सावधान होवून सलामी दिली. विषेश करुन इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील सोलापूर बिड व लातुर येथील काही नागरिक आल्याचे चर्चीले जात आहे. ठिक 11.11 वाजता सर्व सहा सेक्टरंवर एकाच वेळी आदली(फटाके) लावुन वेळेचे भान म्हणून इशारा देवून लागलीच हाजारो हात 11,111 वृक्ष लागवडीच्या कामात मग्नं झाले. सर्व स्तरातील लोकांनी अवघ्या काही क्षणातच वृक्ष लागवड करुन वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड ब्रेक करुन हाती घेतलेले मोहिम अवघ्या काही क्षणातच फत्ते करुन मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केली. अवाहनानुसार रोपांचे 04 वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावून वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर वृक्ष प्रेमींना इच्छेनुसार वृक्ष व त्यास लागणारे ट्री गार्ड वाटप करण्यात आले.
विषेश म्हणजे मा. अति. जिल्हा सत्र न्यायालय परिसरात मा. अति. सत्रस न्यायाधिश साहेब, श्री. आर के राजे भोसले, श्री.एन.ए. इंगळे दिवानी न्यायाधिश, श्री आर पी बाठे सह. दिवाणी न्यायाधिश साहेब, श्री. एम.ए. शेख साहेब दुसरे सह दिवानी न्यायाधिश साहेब, यांनी न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ संघटना यांनी याच कार्यक्रमाचा सहभाग म्हणून 10.35 वाजता न्यायालयीन परिसरात वृक्ष लागवड करुन आनंदोत्सव साजरा केला.या शुभारंभाच्या प्रसंगी मा. आ. राणा जगजितसिंह पाटील, मा. आ. कॅलास पाटील, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब, सौ. महिमा अतुल कुलकर्णी मॅडम, सौ. अस्मिता सचिन ओम्बासे मॅडम, मा. एम रमेश साहेब सहा पोलीस अधीक्षक उपविभाग कळंब, कैशल्यं विकास विभागाचे सहा. आयुक्त श्री. संतोष राऊत साहेब, पोलीस निरीक्षक सुरेश साबळे साहेंब, नायब तहसिलदार खोंदे साहेब व पोलीस ठाणे कळंब व उपविभागाचे पोलीस अधिकारी तसेच नगर परिषद कळंबचे मुख्याधिकारी सौ शैला डाके मॅडम, पंचायत समिती गट विकास अधिकारी रावसाहेब चकोर साहेब, तसेच नॅचरल शुगरचे चेरअमन बी.बी. ठोंबरे, पर्याय संस्थेचे विश्वनाथ तोडकर, धनेश्वरी शिक्षण समुहाचे श्री. प्रताप पाटील साहेब, भुमीपुत्र वाघ, शिक्षक संघटणेचे बाळकृष्णं तांबारे, महिला समाज सेवक ज्योतीताई सपाटे व महिला कार्यकर्त्या पत्रकार संघटनेचे सतिश टोणगे व अमर चोंदे( मराठवाडा उपाध्यक्ष व्हाईस ऑफ मिडीया), तसेच बालाजी (बप्पा) आडसुळ( दैनिक लोकमत तालूका प्रतिनिधी) तसेच सर्व पत्रकार बांधव व मिडीया तसेच कळंब उपविभागातील सर्व पोलीस पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुभारंभचे वृक्षरोपन संपन्न झाले. या मोठ्या प्रमाणात आयोजित केलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रम पोलीस प्रशासन व सकल कळंबकर यांनी पार पाडल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी साहेब, मा. आ. राणा जगजितसिंह पाटील साहेब, मा. आ. कैलास पाटील साहेब यांनी आभार मानुन शुभेच्छा दिल्या.
0 Comments