केबल चोरीतील आरोपी अंबी पोलीसांच्या ताब्यात
प्रतिनिधि रूपेश डोलारे उस्मानाबाद
उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील कुंभेजा येथील घनशाम संतराम नलवडे, वय 50 वर्षे, यांचे दि. १ ऑगस्ट रोजी 12.00 वा. सु. ते दि. 02.08.2023 रोजी 01.00 सोनारी शिवारात हारणवाडा येथील शेतातील पाण्याच्या मोटारीचे अंदाजे 2,560 ₹ किंमतीचे केबल 60 फुट अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या घनशाम नलवडे यांनी दि.03.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अंबी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे
गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली अंबी पो.ठा. चे प्रभारी सपोनि- श्री. हिंगे, पोलीस नाईक कुंभार तसेच अंबी पोलीस ठाण्याच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शेरी, ता. आष्टी, जि. बीड येथील- विनायक मिश्रीलाल चव्हाण, यास आज दि. 04.08.2023 रोजी शेरी येथुन ताब्यात घेउन गुन्ह्यात चोरी गेलेला माल, केबल वायर जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. नमुद आरोपी कडून पो. ठाणे अंबी गुरनं 95/2023 भादंविसं कलम 379 व पो.ठाणे परंडा गुरनं 207/2023 भादंविसं कलम 379 प्रमाणे दाखल दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपी विरुध्द यापुर्वी बीड जिल्हा व अहमदनगर येथे गुन्हे दाखल आहेत.
0 Comments