Hot Posts

6/recent/ticker-posts

विकास कामत अडथळा करणाऱ्या विरोधात भूम येथील नागरिक , व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

विकास कामत अडथळा करणाऱ्या विरोधात भूम येथील नागरिक , व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव 


धाराशिव:  भूम नगर पालिकेच्या कामकाजाबाबत राजकीय हेतूने व स्वार्थापोटी चुकिची निवेदने व तक्रारी देऊन दिशाभूल करत असल्याचे निवेदन भूम येथील नागरिक , व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले . सोमवार दि ७ रोजी हे निवेदन त्यांनी जिल्हाधीकारी सचिन ओंबासे यांना दिले . 

या निवेदनात म्हटले आहे कि, नगर पालिकेने हद्दीत गेल्या काही वर्षांपासून लाईट , पाणी , नाली स्वच्छता , रस्ते , आरोग्य विषयक सोयी सुविधा चांगल्या पद्धतीने राबविल्या आहेत . मागील काही दिवसांपूर्वी नगरसेवकांची मुदत संपल्याने येथे प्रशासकाच्या माध्यमातून कामकाज चालू आहे . त्यांनीही शहरात नागरिकांच्या गरजेच्या सुविधा चांगल्या पद्धतीने दिल्या आहेत . काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या स्वार्थापोटी नगर पालिका प्रशासनाला वेठीस धरून त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यासाठी नगर पालिका प्रशासनाच्या विरोधात तक्रारी , निवेदन , उपोषणाच्या नोटीस देणे यासह विविध मार्ग अवलंबून प्रशासनाला वेठीस धरण्याचे काम केले जात आहे . या माध्यमातून दबाव टाकल्याचा प्रयत्न केला जात आहे . हा प्रकार वारंवार घडत आहे . त्यामुळे नागरिकांच्या गरजेच्या होऊ घातलेल्या विकास कामांना यामुळे अडथळा घालण्याचे काम केले जात असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . निवेदनात म्हटले आहे कि , शहराला सुरळीत स्वच्छ पाणी पुरवठा होत आहे . तरीही हे लोक लाईट गेल्यानंतरची फिल्टरचे फोटो काढून सोशल मीडियावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत . शहरातील नागरिकांच्या हितासाठी डुक्करांचा बंदोबस्त केला आहे . घंटागाड्या दररोज येतात . नाल्यांची सफाई नियमित होत आहे . यासह विविध कामे सुरळीत चालू आहेत . प्रशासकांचे काम सुरळीत व चांगले चालू असल्याचे या निवेदनात म्हटले आहे . 

यावेळी दिलीप गाढवे , बाबा पटेल , गुरुदत्त नाईकवाडी , कांतिलिंग थोरात , सुनिल थोरात , मामू जमादार , बबलू बागवान , रवींद्र आकरे , संजय साबळे, सहदेव गाढवे , सूरज गाढवे , लक्ष्मण शिंदे , सुधीर देशमुख , श्रीराम मुळे , संदीप मोटे , महेश गुळमे , रामभाऊ बागडे , नारायण वरवडे , प्रा दत्तात्रय साठे , प्रताप गाढवे , संजय देवडीकर , अमोल भोसले , विनायक मस्के , संजय होळकर , जाकीर शेख , अमोल माळी , अमोल गायकवाड, रणजित साळुंके , बालाजी माळी ,मुशीर शेख यांच्यासह नागरिक व व्यापारी हजर होते.


Post a Comment

0 Comments