स्पर्धा परीक्षा हीच खरी जीवनाची परीक्षा : रतनचंद तलकचंद दोशी यांचे प्रतिपादन
नातेपुते प्रतिनिधी : रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मंथन टॅलेंटसर्च परीक्षेतील यशस्वी ३७ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते घेण्यात आला. विद्यार्थी दशेत स्पर्धा परीक्षा हीच जीवनाची खरी परीक्षा असते. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्पर्धा परीक्षेकडे अधिक लक्ष घालून प्रत्येक सामान्य ज्ञान व स्पर्धा परीक्षेत हिरारीने भाग घ्यावा असे प्रतिपादन करमाळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मा. श्री रतनचंद तलकचंद दोशी यांनी केले ते रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे १५ ऑगस्ट रोजी मंथन टॅलेंट सर्च परीक्षेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते. त्यांच्याच शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
"लहानग्या वयात मुलांना स्पर्धा परीक्षेची ओळख होणे गरजेचे असते. याच वयात आपल्या शाळेतील मुलांनी यश संपादन केल्याचे पाहून मी अचंबित झालो" असे मत जैन सोशल ग्रुप पंढरपूरचे अध्यक्ष राजेंद्र शहा यांनी व्यक्त केले.
रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनंतलाल दादा रतनचंद दोशी म्हणाले की," कोणत्याही परिस्थितीत कष्टाचा बाऊ न करता मेहनत केली पाहिजे. अशाच प्रकारची मेहनत आपल्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी केलेली आहे, त्यामुळेच आजचे यशस्वी विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, इतर विद्यार्थ्यांनीही शिक्षणाचे महत्त्व जाणून संघर्ष केला पाहिजे यामुळेच भविष्यात तुमचे नाव उज्वल होईल"
कार्यक्रमाच्या सुरुवातीस चेअरमन मा. श्री.प्रमोद भैय्या दोशी यांनी शाळेचा इतिहास थोडक्यात सांगून, मागील वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला. सक्षम नागरिक घडवणे यासाठी संस्कार हे गरज असल्याचे त्यांनी सांगितले, त्यासाठीच प्रत्येक वर्षी प्रशालेमध्ये दशलक्ष पर्व साजरे करत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक शनिवारी फळ वाटपाचा कार्यक्रम घेणारी एकमेव शाळा असल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय खेळांमध्ये आपल्या प्रशालेचे विद्यार्थी सहभागी झाल्याची आठवण त्यांनी करून दिली. भविष्यात स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना समर्थपणे आव्हाने पेलता यावीत, तशी दृष्टी तयार व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षणातच बीज रोवले जाते यासाठी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मंथन टॅलेंट सर्च परीक्षा दिली व यातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी आज आपण हा कार्यक्रम आयोजित करत असल्याचे त्यांनी सांगितले"
सदर कार्यक्रमास रतनचंद तलकचंद दोशी, राजेंद्र शहा, अनंतलाल दोशी, विजय विनोदकुमार गांधी,अजित दोशी, महावीर शहा, विरकुमार दोशी, प्रमोद दोशी, वैभव शहा, संजय गांधी, प्रज्योत गांधी,वालचंद शहा, प्रज्योत फडे, निशांत फडे, सिद्धांत शहा , अभिजीत दोशी, बाहुबली दोशी, वसंत ढगे,बबन गोफणे,सुरेश धाइंजे,संजय दोशी , प्रितम दोशी , रामदास गोपणे , सुरज दोशी , निवास गांधी, अजय गांधी,संजय दोशी, दत्ता भोसले, सोमनाथ राऊत, ज्ञानेश राऊत, अरविंद भोसले,
विनयश्री दोशी,पूनम दोशी, पार्वती जाधव, निकीता शहा, सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षेकत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आणि देशभक्तीपर नारे देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निंबाळकर यांनी केले प्रस्ताविक शिक्षक वाघमोडे यांनी तर आभार प्रदर्शन पाटील यांनी केले.
0 Comments