Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव शहरांमध्ये महिलांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेमध्ये सहभागी होत महिलांनी केला आनंद द्विगुणीत

धाराशिव शहरांमध्ये महिलांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेमध्ये सहभागी होत महिलांनी केला आनंद द्विगुणीत

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव


धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - महिला व लहान मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या संगीत खुर्ची, प्रश्न मंजुषा, देशभक्तीपर गीते आदी स्पर्धां तर खाद्य पदार्थ व राख्यासह इतर वस्तूंची विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. याचा मनमुराद आनंद सहभागी झालेल्या महिला व लहान मुलींनी लुटत आपला आनंद द्विगुणीत केला.

धाराशिव शहरातील पवनराजे कॉम्प्लेक्समधील समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संयोजिनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर, अस्मिताताई सचिन ओंबासे, शुभांगी कैलास पाटील, शिवसेना महिला आघाडी प्रमुख शामलताई वडणे, वैशाली मकरंद राजेनिंबाळकर, डॉ सविता गिरबाइड , डॉ शितल मिरजकर, पूर्वा अक्षय ढोबळे आदी उपस्थित होत्या. यावेळी स्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. तर स्पर्धेतील विजेत्यांना सोन्याची नथ, चांदीच्या भेटवस्तू, पैठणी व लहान मुलांना इतर भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित त्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन ॲड भाग्यश्री रणखांब यांनी केले होते. प्रस्ताविक युवती सेनेच्या उपजिल्हाप्रमुख तथा स्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री रणखांब यांनी तर सूत्रसंचालन द्वारका देवळे यांनी केले. यावेळी शहरातील महिला व मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


Post a Comment

0 Comments