तुळजापुर तालुक्यातील पांगरदरवाडी ग्रामस्थांचा महसूली सज्जासाठी मतदानावर बहिष्कार,ग्रामसभेत बहुमताने ठराव मंजूर, प्रशासनाच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर
तुळजापुर : तालुक्यातील पांगरदरवाडी ग्रामस्थांनी महसूली सज्जाच्या मागणीसाठी आगामी येणाऱ्या निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार घातला असुन सोमवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेत हा एकमताने निर्णय घेण्यात आला. सरपंच सिंधू पोफळे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच सोमनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये विविध विषयावर चर्चा करुन कामाची अंमलबजावणी करण्यात आली.
गेल्या चार दशकापासून येथील ग्रामस्थांची स्वतंत्र सज्जाची मागणी असुन अनेकवेळा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिलेली आहेत. मात्र, प्रशासनाने याकडे फारसे गांभीर्याने पहिले नाही. परिणामी येथील ग्रामस्थांना अनेक योजनापासून वंचित रहावे लागत आहे. या गावास यापूर्वीच महसूली दर्जा आहे. मात्र, या गावचे सातबारे अद्यापही ऑनलाईनला दाखवत नाहीत. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी याकडे लक्ष देऊन गावच्या सातबाऱ्याची मॅपिंग करुन गावाची अडचण दूर करावी व गाव महसूली सज्जासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा अन्यथा येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच बेटी बचाव बेटी पढाव याला चालना देण्यासाठी 15 ऑगस्ट पासून गावामध्ये जन्मनाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावे पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करणार असल्याची माहिती उपसरपंच सोमनाथ शिंदे यांनी दिली. या योजनेचे ग्रामस्थांनी स्वागत केले. तसेच या ग्रामसभेत पाणी पुरवठा, रोजगार हमी योजना, पंधरा वित्त आयोग, कृषी, विद्युत महामंडळाचा आढावा घेण्यात आला व शासकीय योजना प्रभावी रित्या रबावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या ग्रामसभेचे प्रशासकीय कामकाज एल.के.सुरवसे यांनी पहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापू साळुंके, लक्ष्मण क्षीरसागर, गणेश गायकवाड, अमोल मारडकर, धनाजी शेळके, प्रताप निंबाळकर, माजी सरपंच शंकर कदम आदी बहुसंख्येने ग्रामस्त उपस्थित होते.
0 Comments