Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे स्वतंत्र दिनानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने माजी सैनिकांचा भव्य सत्कार

तुळजापुर तालुक्यातील  चिवरी येथे स्वतंत्र दिनानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने माजी सैनिकांचा भव्य सत्कार 
प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव 

तुळजापुर : तालुक्यातील चिवरी येथे दि,१५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनानिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने गावातील ३५ माजी सैनिकांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

,यावेळी गावचे सरपंच  सौ शिवकन्या प्रशांत  बिराजदार,उपसरपंच लक्ष्मण लबडे,सचिन भैय्या बिराजदार,विठ्ठल  होगाडे,किसन शिंदे,सामाजिक कार्यकर्ते राजू भैय्या कछवा यांच्या प्रयत्नातून सर्व माजी सैनिकाना भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्कार करण्यात आला, यावेळी  दत्तू अण्णा पाटील माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांनी गावातून प्रभात फेरी काढून माजी सैनिकांच्या सत्कार प्रसंगी हजेरी लावली. यावेळी गावातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच माजी सैनिकानी आभार मानले.


Post a Comment

0 Comments