Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव ते कन्याकुमारी सायकल प्रवार करणाऱ्या धाडसी तरुणांचा सत्कार

धाराशिव  ते कन्याकुमारी सायकल प्रवार करणाऱ्या धाडसी  तरुणांचा सत्कार


उस्मानाबाद- रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद व हाफ मॅरेथॉन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 17 तरुणांनी उस्मानाबाद ते कन्याकुमारी असा 1360 कि.मी. सायकल प्रवास पुर्ण करुन नवा इतिहास रचला आहे.  त्यात रोटरी क्लब उस्मानाबादच्या 12 सदस्यांचा सहभाग होता.  दिनांक 08 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 हा या प्रवासाचा कालावधी होता.  या प्रवासात त्यांनी ठिकठिकाणच्या रोटरी क्लबला सदच्छी भेटी दिल्या.


  रोटरी क्लब उस्मानाबादच्या वतीने रविवारी दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी जे.एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय, उस्मानाबाद येथे या सर्व सायकल वीरांचा मानचिन्ह व शाल देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.  या सत्कारास प्रमुख अतिथी म्हणुन आयर्नमॅन शाम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.  हाफ मॅरेथॉनचे गिरीश अष्टगी, रोटरी क्लब उस्मानाबादच्या अध्यक्षा रो. डॉ. अनार साळुंके, सचिव रो. डॉ. मिना जिंतुरकर हे मंचावर उपस्थित होते.  प्रस्ताविक डॉ. अनार साळुंके यांनी केले तर प्रमुख पाहुणे शाम शिंदे यांची ओळख श्री. रवीकांत शितोळे यांनी करुन दिली.  या प्रसंगी सायकलवीर रो. रणजित रणदिवे, रो. सुरज कदम व श्री. प्रदिप खामकर तसेच सौ. रुपाली रणजित रणदिवे यांनी मनोगत व्यक्त केले.  माजी प्रांतपाल व क्लब ट्रेनर रो. रवींद्र साळुंके यांनी समारोप केला.  सचिव रो. डॉ. मिना जिंतूरकर यांनी आभार प्रदर्शन तसेच सुत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments