Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर देवस्थान क्षेत्रांतर्गत आदिमाया आदिशक्ती मातंगी देवी मंदिरातील मुख्य नाव बदलून पुरावा नष्ट करण्याचे षडयंत्र हाणून पाडू अन्यथा महाक्रांती धरणे आंदोलन करणार - भास्कर शिंदे,ॲड. पूजाताई देडे

तुळजापुर देवस्थान क्षेत्रांतर्गत आदिमाया आदिशक्ती मातंगी देवी मंदिरातील मुख्य नाव बदलून पुरावा नष्ट करण्याचे षडयंत्र हाणून पाडू अन्यथा महाक्रांती धरणे आंदोलन करणार - भास्कर शिंदे,ॲड. पूजाताई देडे

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव



तुळजापुर : येथील आई तुळजाभवानी देवस्थान क्षेत्र अंतर्गत अनादी काळापासुन अस्तित्वात असलेले मंदिर श्री आदिमाय आदिशक्ती मातंगी देवी मंदिरावरील जातीय मानसिकता/विषमतेतुन काढलेले मातंगी नांव परत लावण्यात यावे अन्यथा लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने देवस्थानच्या मुख्य प्रवेशव्दारावर दि. १८ सप्टेंबर २०२३ महाक्रांती धरणे आंदोलन करण्याचा इशारा लहुजी विद्रोही सेनेचे संस्थापक अध्यक्ष मातंग  रुदयसम्राट,लहूश्री मा. भास्कर शिंदेसाहेब  यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी व तुळजाभवानी मंदिर संस्थानास दिला आहे.

 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आनादि काळापासुन अस्तित्वात असलेले संस्थान श्री क्षेत्र तुळजा भावानी आई देवस्थान तुळजापूर  मंदिराच्या उत्तर बाजूस असलेले त्रेता युगातील हेमाडपंती मंदिर बांधण्यात आलेले असुन इ. स. पुर्वी कालखंडापासुन अस्तित्वात असलेले मंदिर व संपुर्ण महाराष्टाची व देशातील मातंग वंशाचे २७ राज्यातील ११ कोटी ६५लाख लोकसंख्या असलेल्या मातंगी वंशाची कुलस्वामीनी असलेले हिंदु मंदिर पुर्वी श्री आदिमाय आदिशक्ती मातंगी देवी मंदिर या नावाची ओळख होती परंतु काही दिवसांपूर्वी सदर नावात बदल करून 

श्री आदिमाय आदिशक्ती देवी मंदिर असे नाव देण्यात आले असुन मातंगी हा शब्द काढुन टाकण्यात आला आहे. तरी अस्तित्वात असलेले मंदिराचे नाव बदलण्याचे कटकारस्थान काही धर्म व्देशातुन व जातीवादी लोकांनी काढलेले नाव तुळजापूर देवस्थान क्षेत्रांतर्गत आदिमाया आदिशक्ती मातंगी देवी मंदिरा तील   मुख्या नाव बदलून पुरावा नष्ट करण्याचे षडयंत्र  हानुण पाडू अन्यथा देवस्थानच्या मुख्य प्रवेशव्दारावर दि. १८सप्टेंबर २०२३ महाक्रांती धरणे आंदोलन करण्याचा इशारा लहुजी विद्रोही सेनेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर शिंदेसाहेब यांनी व्यक्त केले यावेळी संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह  संस्थापक सचिव अॅड. पूजा देडे  उपस्थित होते  उस्मानाबादचे जिल्हाधिकारी व तुळजाभवानी मंदिर संस्थानास दिला आहे.



Post a Comment

0 Comments