अनावश्यक खर्चाला फाटा देत आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत साजरा केला मुलीचा वाढदिवस, तुळजापुर येथील क्षीरसागर परिवाराचा प्रेरणादायी स्तुत्य उपक्रम
तुळजापुर: शहरातील दिनेश क्षीरसागर यांनी आपल्या मुलींचा वाढदिवस येथील जय तुळजाभवानी माता केंद्रीय आश्रम शाळा तुळजापूर येथे दि१७ रोजी विद्यार्थ्यांसोबत केक कापून, शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पाहार भोजन देऊन आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला, वाढदिवस म्हटले की, डीजे फटाके, फुगे, मंडप, डेकोरेशन या अनावश्यक बाबीवर भरमसाठ खर्च केला जातो मात्र या सर्वांना फाटा देत क्षीरसागर कुटुंबानी सामाजिक बांधिलकी जपत समाजामध्ये प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे, या उपक्रमाबद्दल परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.१७ ऑगस्ट माझी कन्या (निर्विका ) चा वाढदिवस मुलीच्या वाढदिवसाचा इतरत्र वायफळ खर्च टाळून काल जय_तुळजाभवानी_माता_केंद्रीय_आश्रम_शाळा_तुळजापूर येथील मुला मुलींसोबत वाढदिवस साजरा करून त्या मुलांसाठी अल्प उपहाराची व्यवस्था करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला मी माझ्या मित्रांबरोबर बऱ्याच वेळेस त्या शाळेत गेलो आज पर्यंत अनेक कार्यक्रम घेतले आणि आपलं हे कर्तव्य आहे आपण कुठेतरी समाजाचं देणं लागतो ही एक छोटीशी भावना मनामध्ये ठेवून आसे कार्यक्रम केले पाहिजेत आपण किती देऊ शकतो हे महत्त्वाचं नाही आपण आपल्या परीने काहीतरी करू शकतो त्या मुलांसाठी ज्यांचे आई वडील त्यांच्यापासून शंभर दोनशे किलोमीटर दूर आहेत त्यांना सहा सहा महिने भेटायला सुद्धा येऊ शकत नाहीत आशा मुलांसाठी ज्यावेळेस आपण काही करतोना त्यावेळी त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही देऊन जातो माझ्याकडून त्या मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद आणायचा एक छोटासा प्रयत्न कला.
श्री_दिनेश_धन्यकुमार_क्षीरसागर.
0 Comments